महाजनांचे खळबळजनक वक्तव्य: खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या?

By : Polticalface Team ,21-11-2022

महाजनांचे खळबळजनक वक्तव्य: खडसेंच्या मुलाची हत्या की आत्महत्या? जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक युद्धाने आता अत्यंत विखारी वळण घेतले आहे. गिरीश महाजन यांना मुलगा नसल्याचं वक्तव्य एकनाथ खडसेयांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं, त्यांच्या या वक्तव्यावर आता महाजन यांनी पलटवार केला आहे.

आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हे दोन नेते एकमेकांसमोर आले होते. यावेळी गिरीश महाजन यांनी खळबळजनक विधान केलंय. मला मुलगा नाही, पण दोन मुली आहेत याचा मला आनंद, मात्र खडसेंना मुलगा होता त्याचं काय झालं? खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली का त्याचा खून झाला हे तपासण्याची गरज आहे, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

खडसेंच्या अनेक ठिकाणच्या भानगडी आहेत, चौकशीमध्ये सबळ पुरावे मिळत असल्याने खडसे अस्वस्थ आहेत. खडसे आजकाल काय बोलतायत त्याचं त्यांना भान राहत नाहीये. ते बेभान झाले आहेत. कधी मला चावट म्हणतात, कधी बदनामी करा म्हणतात. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस असताना ते काहीही बोलत आहेत, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली आहे.

तुमच्या मागे ईडी लागली, तुमचं कर्तृत्व तसं होतं. भोसरीमध्ये तुम्ही काय काय केलं हे समोर येतंय, लवकरच अजून येईल. भोसरी प्रकरणात जावई 17 महिने झाले जेलमध्ये आहे, त्याचा जामीन तुम्ही का करत नाही? माझ्यावर खडसेंनी मोक्का लावला हे सांगायची गरज नाही. खडसे, वकील प्रविण चव्हाण, पोलीस अधिकाऱ्यांनी रचलेलं षडयंत्र पेन ड्राईव्हने समोर आलं आहे. आता मला मोक्का लावला त्याची आणि खडसेंची ईडी चौकशी होत आहे. आता दूध का दूध पाणी का पाणी होईल, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष