यवत येथे जिजाऊ ब्रिगेड तर्फे महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार

By : Polticalface Team ,21-11-2022

यवत येथे जिजाऊ ब्रिगेड तर्फे महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न,  विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,२० नोव्हेंबर २०२२, महिलांना रोजगारातील संधी उपलब्ध व्हाव्यात, बचत गटांचे महत्त्व कळावे, स्वतःच्या वस्तूला योग्य तो दाम मिळावा या हेतूने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र तर्फे रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन समृद्धी गार्डन मंगल कार्यालय, यवत तालुका, दौंड,जिल्हा पुणे,या ठिकाणी करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, प्रमुख मार्गदर्शक प्रदेश महासचिव स्नेहा खेडेकर, कार्याध्यक्ष नंदा शिंदे, जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्षा महानंदा दूध डेअरीच्या माजी संचालीका वैशालीताई नागवडे, दौंड पंचायत समिती माजी सदस्य कुंडलीक खुटवड, उद्योजक संजय शहा, बशिर भाई शेख, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बबनराव गायकवाड, दौंड पंचायत समिती सदस्य निशा शेंडगे, यवत ग्रामपंचायत माजी सरपंच रझिया तांबोळी, प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.अंजली कदम, ईश्वर बायोटेक कंपनीचे संचालक संजय वायाळ व वैशाली वायाळ, उद्योजकता विकास मार्गदर्शक व प्रशिक्षक प्रा.सुधाकर फुले व्याख्याते जगदीश ओहोळ,अमर हजारे, बिभीषण गदादे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा संघटक शोभाताई जगताप,पिंपरी महानगर प्रमुख स्मिताताई म्हसकर,तालुकाध्यक्ष दुर्गा उरसळ,हवेली तालुकाध्यक्ष सुनीता गरड, बारामतीच्या अध्यक्ष सायली चव्हाण, रश्मी सातपुते, पंढरपुर जिल्हाअध्यक्ष सुरजा बोबडे विजयालक्ष्मी आळेगी, इंदापूर तालुकाध्यक्ष राधिका शेळके, यवत जिजाऊ ब्रिगेडच्या उर्मिला दोरगे,पुष्पा खेडेकर,छाया चोभे, ईशा दोरगे, पुरंदर तालुकाध्यक्षा दुर्गाताई, दौंड तालुका अध्यक्षा सारिकाताई भुजबळ, मुळशी तालुकाध्यक्षा सायली शिंदे यावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले, या वेळी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे व जिल्हाध्यक्ष जयश्री गटकुळ यांनी जिजाऊ वंदना गायन केले.

या वेळी प्रास्ताविकातून महासचिव स्नेहा खेडेकर बोलताना म्हणाल्या महिलांनी चुल व मुल यात न अडकता स्वयंरोजगार उद्योग व्यवसाय निर्माण करावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचारातील उद्योग व्यवसाय संकल्पना तरुणींनी आत्मसात करणे गरजेचे असल्याची सद्भावना व्यक्त करण्यात आली, तसेच भविष्य काळात रोजगार निर्मितीवर विविध उपक्रम प्रक्रिया उद्योगांवर भर देण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे यांनी बोलताना सांगितले जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या न्याय हक्कासाठी लढाऊ जिजाऊ ब्रिगेड संघटना आहे. न्याय हक्कांसाठी लढा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. एस.एन.डी.टी.कला व आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा. अंजली कदम नारायणे यांनी बोलताना सांगितले महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याशिवाय महिला स्वयंपूर्ण होणार नाहीत, महिलांनी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करावा, छोटे-मोठे उद्योगातील कौशल्य आत्मसात करावेत,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या वेळी उद्योग व्यवसाय प्रशिक्षक प्रा.सुधाकर फुले यांनी शासनाचे विविध उद्योग व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन केले, शासनाच्या वतीने विविध योजना उपलब्ध असताना बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात भटकत आहेत, अशा तरुण होतकरू युवकांना योग्य दिशा व शासनाच्या अनुदानित योजनांची सखोल माहिती विविध महामंडळाच्या योजना, तसेच महिला बचत गट उद्योग व्यवसाय प्रकल्प उभारणी व मार्केटिंग कौशल्य आत्मसात केल्यास तरुण युवक व महिला उंच भरारी घेऊ शकतील असा ठाम विश्वास त्यांनी प्रभावीपणे व्यक्त केला, तसेच उद्योजक ईश्वेद बायोटेक कंपनीचे डायरेक्टर संजय वायाळ यांनी स्वतःउभारलेल्या उद्योग व्यवसाया संदर्भात बोलताना सांगितले, मी सुद्धा शून्यातून उद्योग व्यवसाय उभा करून भरारी घेतली आहे. उद्योग व्यवसायात चढ-उतार सुरू असतात मात्र आपण खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दौंड तालुक्यातील मौजे भांडगाव येथील अंबिका मसाले उद्योजिका कमलताई परदेशी यांनी बोलताना सांगितले बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील २६५ शेत मजुर महिलांना एकत्रीत करुन आंबिका मसाले प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उभारण्यात आली असुन, बचत गटाच्या माध्यमातून आंबिका मसाले, सात समुद्र पार, विदेशात जर्मनी सिंगापूर लंडन, दुबई, या देशात आंबिका मसाले पोचवले जात आहेत, तसेच पुणे मुंबईमधील सर्व मॉल, डी स्मार्ट मॉल मध्ये पोचला आहे, कमलताई परदेशी यांनी सुरू केलेल्या मसाले उद्योग व्यवसायात यशस्वी कौशल्य आत्मसात केले असल्याने, त्यांना आज पर्यंत ३०० हुन अधिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्रे मिळाली असुन त्याचे राज्यात कौतुक केले जात आहे. ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांना स्वाभिमान वाटावे असे कर्तबगार कामगिरी अशिक्षित महिला करू शकते याचे साक्षात उदाहरण जमलेल्या बचत गटातील महिलांना परदेशी त्यांनी दिले, जगदीश अमर हजारे, बिबीशन गदादे, अमर हजारे, यांनी बोलताना सांगितले महिलांनी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाईच्या यांच्या आदर्श कर्तबगार कामगिरीचे अनुकरण करावे जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उधारी, रूढी परंपरेची दोरी तोंडुन सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कास धरली, सर्व महिलांना शिक्षणाची दारे खुली केली, राष्ट्रपती प्रधानमंत्री, खासदार, आमदार, न्यायमूर्ती कलेक्टर, उच्च पदावर महिला भगिनी विराजमान झाल्या आहेत, हि स्वाभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी राज्यभरात सामाजिक, राजकीय,उद्योजक, व्यवसाय यासारख्या क्षेत्रात सुरू असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याची माहिती देत यापुढील काळात महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडची वाटचाल सुरू आहे. महिलांनी वेगवेगळ्या व्यवसायातील संधीच्या वाटा शोधल्या पाहिजेत. महिलांना तसेच तरुणींना पुढे जाण्यासाठी कुटुंबाने सुद्धा त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले, उद्योग व्यवसाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मान पूर्वक पुरस्कार, मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, या मध्ये यशस्वी उद्योजक, विशेष सामाजिक पुरस्कार, विशेष पत्रकारिता पुरस्कार,आदर्श शिक्षक पुरस्कार, कृषी विभाग पुरस्कार, कला,कृषक संरक्षण संवर्धन,आरोग्य विभाग, कर्तुत्वान महिला पुरुष, सर्वोत्कृष्ट माता, या पुरस्काराने विविध मान्यवरांना सनमान चिन्ह, बुके, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तर हा स्वयंरोजगार मेळावा कमी कालावधीत यशस्वी करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे जिजाऊ ब्रिगेडच्या दौंड तालुकाध्यक्ष सारिका ताई भुजबळ व संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक भरत भुजबळ यांचे सर्वाधिक मान्यवरांनी आभार व्यक्त केले.

तसेच मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला, विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला यामध्ये, तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना सन्मान चिन्ह देण्यात आले, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बबनराव गायकवाड, रसूलभाई मुलानी, पोपटभाई ताकवणे कुंडलिक खुटवड, मंगेश रायकर, समृध्दी गार्डन लॉन्स चे संजय शहा, उद्योजक बाशिर शेख, अनिल गायकवाड, डॉ संतोष बडेकर, हितेंद्र गद्रे सर, सतिश सावंत सर, विनायक दोरगे, हरिभाऊ बळी, प्रशांत देवकर, अस्लमभाई बागवान, जयश्रीताई रायकर,अनिताताई स्वामी,विरजाताई तांबे, सुनिता पवार,रेखा सिरसागर,सारिका देशमुख, शोभाताई गायकवाड,मेघा रायकर, सुप्रिया हाके,दत्ता डाडर यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती भदाणे यांनी केले तर आभार जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष सारिका ताई भुजबळ यांनी व्यक्त केले,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.