By : Polticalface Team ,22-11-2022
मुंबई वाहतूक पोलिसांना एक ऑडिओ क्लिप पाठवण्यात आली असून या क्लिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीच्या दोघांना याबाबत काम दिलं असल्याची माहिती या ऑडिओ क्लिपमधून मिळाली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांची क्राईम ब्रॅंच टिमकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे.
मुंबई वाहतुक पोलिसांच्या व्हॉट्स्अॅप नंबरवर हा ऑडिओ संदेश मिळाला असून माहितीनूसार हा ऑडिओ संदेश अज्ञात व्यक्तीकडून पाठवण्यात आला आहे.
या ऑडिओ संदेशामध्ये दाऊदच्या कंपनीच्या दोघांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुस्तफा अहमद आणि नवाज असं या दोन व्यक्तींचं नाव असून ज्या व्यक्तीने हा संदेश पाठवला आहे, त्याने त्याच्या नावाचा यामध्ये उल्लेख केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांकडून संदेश पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु असून या प्रकरणी एका हिरा व्यापाऱ्याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आहे वाचक क्रमांक :