By : Polticalface Team ,22-11-2022
वाघ म्हणाल्या, एका महिलेला चहामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तसेच त्यावेळी आरोपींनी पीडितेचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून मागील वर्षभर तिला ब्लॅकमेल केले.
इतकंच नाही तर आता हे व्हिडीओ थेट तिच्या पतीलाही पाठवण्यात आल्या. यानंतर पीडितेच्या पतीचा व्हिडीओ पाहून या धक्क्याने मृत्यू झाला. राज्यातील माय-माऊलींनी घाबरून न जाता पुढे येऊन याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्याचं आवाहन केलं. तसेच सरकार तुमच्यासोबत असल्याचा विश्वासही दिला.
तसेच जालना जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली. वर्षभरापूर्वी एका महिलेला चहामध्ये गुंगीचं औषध पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यावेळी काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. यानंतर गेले वर्षभर या महिलेला विविध प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आले वाचक क्रमांक :