अख्खं गाव चालवतंय सेक्सटॉर्शन रॅकेट; पुण्यातील प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन उघड

By : Polticalface Team ,22-11-2022

अख्खं गाव चालवतंय सेक्सटॉर्शन रॅकेट; पुण्यातील प्रकरणाचं राजस्थान कनेक्शन उघड पुणे : सोशल मीडियावर तरुणीची नग्नवस्थेतील फोटो प्रसारित करण्याच्या धमकीमुळे दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यामध्ये इमारतीवरुन उडी मारुन एका तरुणाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात एका तरुणीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचं थेट कनेक्शन राजस्थानला असल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमधील गुरुगोठडी हे संपूर्ण गांव सेक्सटॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील सेक्सटॉर्शन प्रकरणी तपसादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीने याबाबत कबुली दिली आहे.

या चौकशीदरम्यान राजस्थानमधील गुरुकोठडी हे संपूर्ण गांव सेक्सटॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे. या सर्व घटनांचा पोलिस तपास करत होते. या दरम्यान पोलिसांना राजस्थानमधील या संपूर्ण घटनेमध्ये ही महत्वपूर्ण बाब उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील दोन तरुणांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली. ज्या मोबाईल नंबरवरुन या मुलांकडे खंडणी मागितली जात होती, त्या नंबर्सचे लोकेशन पुणे पोलिसांनी शोधले. ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी गावातील निघाले.

पुणे पोलिसांच्या एका पथकाने थेट ते गाव गाठले आणि तेथून अन्वर खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा गावातील लोकांनी पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या. गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत, असे त्याने सांगितले.

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केली जातात. त्यानंतर मुलगी बोलतेय असे सांगून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांचे काही फोटो, व्हिडिओ शेअर करायला सांगितले जातात. त्यानंतर हे फोटोज मॉर्फ करुन, अर्थनग्न करुन त्यांना पाठवले जातात. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. त्यांची फसवणूक केली जाते. सध्या हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष