By : Polticalface Team ,24-11-2022
आणखी एक हार्दिक पटेल रिंगणात! सध्या भाजपात असलेल्या पण पाटीदार आरक्षण आंदोलनातून प्रसिद्धीझोतात आलेल्या हार्दिक पटेल यांच्याविरोधात आणखी एका हार्दिक पटेल यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. हार्दिक जगदीशचंद्र पटेल यांच्या नावाने अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. ते स्वतः नवीन हार्दिक पटेल या नावाने आपला प्रचार करत आहेत.
41 वर्षीय हार्दिक पटेल म्हणतात कि, "भाजपच्या हार्दिक पटेलने 2015 च्या पाटीदार आरक्षण आंदोलनात प्राण गमावलेल्या 14 तरुणांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळेच मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे."
तिसऱ्या हार्दिक पटेल यांची माघार वीरमागाममधील भाजप उमेदवार असलेल्या हार्दिक यांचे पूर्ण नाव हार्दिक भरतकुमार पटेल आहे. पण याच निवडणुकीत तिसऱ्या एका हार्दिक पटेलनेही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर त्यांनी निवडणुकीच्या आपला अर्ज माघारी घेतला आहे.
हार्दिक पटेल याआधी काँग्रेसमध्ये होते पण विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विरमगाम हा मतदारसंघ गेल्या 10 वर्षांपासून ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. यावेळी भाजपने विरमगामची जागा जिंकण्यासाठी हार्दिक पटेल यांना उमेदवारी दिली आहे. हार्दिक यांच्या उमेदवारीमुळे विरमगाम मतदारसंघ हा चर्चेचा विषय ठरला आहे.
हार्दिक पटेल यांची लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार लखाभाई भारवाड यांच्याशी असेल. भारवाड यांनी २०१७मध्ये भाजपच्या तेजश्री पटेल यांचा पराभव केला होता. यावेळी भाजपने हार्दिक पटेल यांना या रिंगणात उतरवले आहे. पण इतिहास पाहता त्यांना ही निवडणूक अवघड जाऊ शकते वाचक क्रमांक :