विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक; पत्नी आणि मुलीनं दिली हेल्थ अपडेट
By : Polticalface Team ,24-11-2022
पुणे : हिंदी, मराठी चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी बुधवारी रात्रीपासून पसरत आहे. सोशल मीडियावर या हरहुन्नरी अभिनेत्याला श्रद्धांजलीही अर्पण केली जात आहे. आता मात्र विक्रम गोखले यांच्या कुटुंबियांनी असं काही झालंच नसल्याची माहिती दिलीय. त्यांच्या मुलीनेही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलंय.
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा. विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही.
विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वृषाली यांनी सांगितलं की, विक्रम गोखले यांच्यावर 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत थोडी बरी झाली होती पण पुन्हा त्यांची तब्येत खालावली. त्यांना हृदय आणि किडनी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागले
वाचक क्रमांक :