शेडगाव मध्ये सद्गुरु कृषि महाविद्यालय मिरजगाव येथील कृषिदूतांचे आगमन

By : Polticalface Team ,25-11-2022

शेडगाव मध्ये सद्गुरु कृषि महाविद्यालय मिरजगाव येथील कृषिदूतांचे आगमन श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न व श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित,सदगुरू कृषि महाविद्यालय मिरजगाव येथील कृषिदूतांचे आगमन झाले असून गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी या कृषिदूतांचे स्वागत केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न असलेल्या सद्गुरू कृषि महाविदयालय मिरजगाव येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषिदूत अक्षय नागरगोजे,सिद्धांत उगले,अमेय मोरे,सिद्धार्थ कोळेकर,प्रवेश केवट, शुशांक पवार,जयेश जाधव हे १० आठवडे गावात राहून विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उपक्रमाचा उद्देश व रूपरेखा ग्रामस्थांना समजावून सांगितली आणि गावाचे एकूण क्षेत्रफळ, लागवडीखालील क्षेत्र व पाणी पुरवठ्याचे स्त्रोत आदी बाबींवर सरपंचासोबत चर्चा केली. तसेच ग्रामसेवकांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमास आवश्यक ते सहकार्य प्रशासनाकडून केले जाईल असे आश्वासन दिले. यावेळी गावचे सरपंच संध्याताई शेंडे, सोनाली भदे उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी श्री देवतरसे,विजय रसाळ,शाहुराज भोपळे ग्रामपंचायत सदस्य,शेडगाव वि.का. चेरमन लक्ष्मण रसाळ, श्री दत्त वि.का.चेरमन राजाराम रसाळ, पोलिसपाटील कारभारी बेलेकर व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषिदूतांना श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान मिरजगाव या संस्थेच्या अध्यक्षा सौ.कल्याणीताई नेवसे, संस्थापक श्री.शंकरराव नेवसे, सचिव श्री. राजेंद्रजी गोरे, नोडल अधिकारी श्री.अण्णासाहेब रासकर,प्रशासकीय अधिकारी श्री.सखाराम राजळे,महाविद्यालयाचे समन्वयक श्री.प्रसाद पाटील, प्राचार्य .डॉ. रामदास बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा.श्री अमोल विधाते,प्रा.श्री शिवम यादव व इतर विषयतज्ञ प्राध्यापक वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी