जेजुरी श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त यांच्या गैरकारभाराची चौकशी व कारवाईची मागणी, पंकज धिवार यांचा ७ डिसेंबर पासून, अमरण उपोषणाचा इशारा

By : Polticalface Team ,26-11-2022

जेजुरी श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त यांच्या गैरकारभाराची चौकशी व  कारवाईची मागणी, पंकज धिवार यांचा  ७ डिसेंबर पासून, अमरण उपोषणाचा इशारा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सासवड ता २५ नोव्हेंबर २०२२, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी ता पुरंदर जिल्हा पुणे, धर्मदाय विभाग पुणे यांच्या (अ वर्ग) श्रेणीच्या मानाने देवसंस्थानचे विश्वस्त खऱ्या अर्थाने भाविक भक्तांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असुन, श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे केली आहे, तसेच दि, १ डिसेंबर पर्यंत संबंधित देवस्थान विश्वस्तांनवर कायदेशीर कारवाई केली नाही तर दि, ७ डिसेंबर रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालय समोर अमरण उपोषण, करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांनी दिला आहे, श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळाने मनमानी कारभार हाताळत श्री मार्तंड देवस्थान घटनेत तरतूद नसताना देखील अटी व शर्तीचे उल्लंघन करून, भाविकांनी दिलेल्या निधिचा गैरवापर करण्यासाठी आणि स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी मुख्याधिकारी पद निर्माण करून देवस्थान विश्वस्तांनी घटनाबाह्य काम केले असल्याचे दिसून येत आहे, मल्हार भक्तनिवास स्थान भाविकांच्या सेवेसाठी असुन त्या ठिकाणी विश्वस्त निवासाला असल्याचे निदर्शनास येत आहे, तोतया मुख्यअधिकारी गेली ५ वर्षापासून भक्तनिवासामध्ये कोणतेही शुल्क न देता निवासाला आहे, कोरोना काळात गोरगरीब लोकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने अन्नदान व किराणा मालाचे वाटपात गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते, गेली ५ वर्षापासून एकाच किराणा व्यापाऱ्याकडून माल घेतला जातोय, या किराणा व्यापाऱ्याकडून देवस्थान ट्रस्टच्या काही विश्वस्तांना मोफत माल व साहित्य पुरविले जाते, श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टीने ७ कोटी रुपये बिलाची रक्कम एकाच किराणा मालकाला कसे दिले या प्रकरणी कसून चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, श्री मार्तंड देवस्थान डायलेसीस सेंटर मध्ये भाविक भक्त गोरगरीब सर्वसामान्य गरजु रुग्णांनासाठी मोफत मशिनरी देणगी स्वरुपात दिली जातात परंतु काही विश्वस्त याची खोटी बिलं करून पैशाची उधळपट्टी करत आहेत, विश्वस्त मंडळाकडून रुग्णांची हेळसांड केली जात आहे, श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या गैरकारभाराची तंबल अनेक मुद्देसूद यादीच धर्मदाय आयुक्त अधिकारी पुणे यांच्याकडे देण्यात आली असून श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाने आज पर्यंत केलेल्या घटनाबाह्य कामांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी भूमिका घेतल्याने पुरंदर तालुक्यात व जेजुरी परीसरात चर्चेला उधाण आले आहे, संबंधित देवस्थान मंडळाचे धाबे दणाणले असून खळबळ उडाली आहे, रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांनी धर्मदाय आयुक्त पुणे, जिल्हा अधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, चारिटी कमिशनर वरळी मुंबई, हायकोर्ट मुंबई, सह धर्मदाय आयुक्त कार्यालय कै,बा,स, ढोल पाटील रोड पुणे स्टेशन दि १८ नोव्हेंबर २०२२ रोजी श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार, रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांनी सह धर्मदाय आयुक्त पुणे यांच्याकडे, लेखी निवेदनाद्वारे केली आहे. श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी येथील विद्यमान विश्वस्त मंडळाने त्यांच्या कार्यकाळात धर्मदाय आयुक्तांच्या नेमावली घटनेतील नियमांना तिलांजली देत स्वाधिकाराणे मुख्याधिकारी या पदाची नियुक्ती करत त्याच्या मार्फत लाखो रुपये गिळानंकृत केले आहेत. श्री मार्तंड देवस्थानला भाविक भक्त मोठ्या प्रमाणात देणगी देतात त्या पैशाचा देखील ताळेबंद लागत नाही. व्ही आय पी पासची जी २००, रुपये फी आकरण्यात येते, त्याचा देखील हिशोब नाही. अन्नदान छत्रसाठी जो किराणा माल घेतला जातो त्यासाठी कुठेही टेंडर प्रक्रिया राबवली जात नाही. गडावर भाविक जाण्यासाठी रस्ता जो धर्मादाय आयुक्त साहेबांनी २०१६ साली जे आदेश दिलेले आहेत त्यालाही हरताळ फासत या विश्वस्तानी पूर्वीच्याच मार्गांवर मुरूम टाकून दुरुस्ती दाखवत पैसे खिशात घातले आहेत. हालचिटाळ बांधण्यासाठी जी जमीन खरेदी केली आहे, ती जमीन निर्धारित बाजार मुल्या पेक्षा अधिक दराने खरेदी दाखवून, पैसे खिशात घातले आहेत. अशा प्रकारे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या विश्वस्त मंडळावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यासाठी दि. ७ डिसेम्बर २०२२ पासून आपल्या कार्यकर्त्यां समवेत धर्मादाय आयुक्त कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचे धिवार यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले, त्याच बरोबर ते असेही म्हणाले की या विश्वस्त मंडळाचे विश्वस्त होण्यापूर्वी दिलेले प्रतिज्ञा पत्रातील आर्थिक स्थिती व आत्ताची आर्थिक स्थिती तपासावी यासाठी आयकर विभागाला देखील पत्र दिले असुन श्री मार्तंड देवस्थान विद्यमान ट्रस्टी विश्वस्तांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी, या संदर्भात संबंधितांन विरोधात आमरण उपोषणाचा, लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.