यवत बस स्टॅन्ड पोलिस स्टेशन समोरील, सेवा मार्गातील वाहतूक कोंडीचा अडथळा झाला मोकळा
By : Polticalface Team ,26-11-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,२६ नोव्हेंबर २०२२, यवत येथील पोलिस स्टेशन समोरील सेवा मार्गात झाडाचा अडथळा निर्माण होत असल्याने, व सेवा मार्गातील वाहतूक कोंडी पाहता, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे दि,१० ऑक्टोबर २०२२ रोजी, यवत येथील पीएमपीएल बस स्टॉप पोलीस स्टेशन समोर सेवा मार्गात झालंय पार्किंग स्टॅन्ड, बस वाहतुकीस होतोय अडथळा, पॉलिटिकल फेस न्यूज वेब पोर्टल या सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती, त्या अनुषंगाने यवत ग्रामपंचायत विद्यमान सरपंच समीर दोरगे यांनी यवत येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन सेवा मार्गावर असलेल्या झाडांमुळे वाहतूक कोंडी होत असुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच विद्या विकास मंदिर, पी एम पी एल बस स्टॅन्ड, यवत पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत कार्यालय पी डी सी बँक या सेवा मार्गा लगत असल्याने या ठिकाणी सतत नागरिकांची गर्दी असते, तसेच ( पाटस टोल प्लाझा कर्मचारी यांना वेळोवेळी या भागातील विविध प्रकारच्या समस्यावर उपाययोजना संदर्भात सेवा मार्गा लगत असलेल्या ड्रेनेज लाईन, दुरुस्ती, भुयारी मार्गात पाऊसाचे पाणी साठत असल्याने व सेवा मार्गातील झाडे काढण्या बाबत नागरिकांनी व ग्रामपंचायत विभाग पदाधिकारी ग्रामस्थांनी संपर्क साधला होता मात्र पाटस टोल प्लाझा सेवा मार्ग दुरुस्ती व्यवस्थापकांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, उडवा उडवी ची उत्तरे देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे वरिष्ठ अधिकारी यांची परवानगी आल्याशिवाय काम करता येत नाही असे अनेक वेळा त्यानी सांगितले होते.
अखेर या सेवा मार्गातील वाहतूक कोंडीचा अडथळा यवत ग्रामपंचायत विभागाकडून मोकळा करण्यात आला आहे, मात्र यवत पोलीस स्टेशन समोरील गेटमध्ये बांधकाम केलेले बंदीस्त लाईन सेवा मार्गातील दोन झाडांमुळे सपादुन जात होती आता मात्र ते स्पष्ट समोर आलेले दिसुन येत आहेत, यवत पंचक्रोशीतील नागरिकांची दररोज वर्दळ असल्याने या ठिकाणी वाहतुक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता, सेवा मार्गातील दोन वृक्ष काढल्याने वाहतूकीचा कायमचा मार्ग मोकळा झाला आहे.
यवत गावचे विद्यमान सरपंच समीर दोरगे यांनी लक्षपुर्वक नागरीकांच्या मागणीचा पाठपुरावा करून यवत वनपाल यांना दि,१०/१०/२०२२,रोजी वृक्षतोडी परवानगी बाबत कळविले होते, त्या अनुषंगाने यवत वनपाल, वनपरीक्षेत्र वरीष्ठ अधिकारी दौंड यांनी स्वतः समक्ष वृक्ष पाहणी करून, महाराष्ट्र झाडे तोड (नियमन) अधिनियम १९६४, चा सुधारीत अधिनियम २६/८९ मधिल कलम (३१)(ब) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पिंपणी़ झाड, गुलमोहर झाड, पाडण्याची परवानगी देण्यात आल्याने आज दि,२६ नोव्हेंबर २०२२, रोजी सेवा मार्गातील अडथळा निर्माण होत असलेल्या या दोन वृक्षांना मुळासकट उखडण्यात आले, या वेळी
यवत ग्रामपंचायत विद्यमान सरपंच, समीर दोरगे, विद्यमान सदस्य नाथदेव (आबा) दोरगे, युवा नेते गणेश शेळके, आर पी आय आठवले गटाचे कार्यकर्ते अनिल गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच पाटस टोल कर्मचारी आणि यवत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.