पत्रकारपरिषेदत राडा! गुणरत्न सदावर्तेंवर फेकली काळी पावडर

By : Polticalface Team ,26-11-2022

पत्रकारपरिषेदत राडा! गुणरत्न सदावर्तेंवर फेकली काळी पावडर
सोलापूर : ऐन पत्रकार परिषद सुरू असताना वकील गुणरत्न सदावर्तेंवर काळी पावडर फेकण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला. ही घटना सोलापूरमध्ये घडली

गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असतानाचा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान त्यांच्या अंगावर काळी पावडर फेकली गेली. ही घटना घडताच सदावर्ते समर्थक आणि सदावर्तेंचे अंगरक्षक पुढे सरसावले होते. दरम्यान पावडर फेकणाऱ्यास पकडण्यात आले असून त्याची रवानगी पोलिसांकडे झाली.

सदावर्ते म्हणाले, संविधान दिनी काही लोकांना आमच्या अंगावर सोडून आम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेल्या सेल्युलर जेलमध्ये उपवास करुन आलेली माणसं आहोत. आम्हाला या सगळ्या गोष्टी पानी कम चाय आहेत. मला शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची किव येते. त्यांनी संविधान दिनी माझ्यावर हल्ला केला, त्यांना लाज वाटली पाहिजे. माझ्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. तरीही माझ्या अंगावर काळी पावडर फेकण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरही ती काळी पावडर फेकली. या लोकांना आम्ही घाबरत नाही. आम्ही त्यांना उत्तर देऊ, असंही सदावर्ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांविरोधात तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केली

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी