निंभोरे येथे खंडेश्वर यात्रेस सोमवार पासून प्रारंभ

By : Polticalface Team ,26-11-2022

निंभोरे येथे खंडेश्वर यात्रेस सोमवार पासून प्रारंभ जेऊर प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील ग्रामदैवत खंडेश्वर यात्रेस सोमवारपासून प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्षापासून होत नसलेली यात्रा यावर्षी जोरदार होणार आहे. निंभोरे गावचे ग्रामदैवत खंडेश्वर देवस्थान आहे या देवाच्या दर्शनासाठी आसपासच्या गावातील भक्तजन दर्शनासाठी येत असतात त्यानिमित्ताने यावर्षीपासून मोफत महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले आहे.सोमवारपासून देवाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन यावर्षीपासून चालू केले आहे. त्या निमित्ताने देवदर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तजनांनी दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊनच बाहेर पडावे अशी विनंती अन्नदात्याकडून केली गेली आहे. देवाला यावर्षी नवीन अश्वही घेण्यात आलेला आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी गाडी ओढण्याचा कार्यक्रम मंदिरासमोर होईल. व त्या दिवशी ही महाप्रसादाचे नियोजन केले आहे.याशिवाय 29 नोव्हेंबर या दिवशी दिवसभर देवाला महाप्रसाद नैवेद्य दाखवला जातो.  पुढे त्याच दिवशी खंडेश्वर देवाचा छबिना रात्री बारा वाजता देवळातून निघतो छबिना देवळाच्या बाहेर निघाल्यावर शोभेचे दारूकाम सोहळा पार पडणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता याचा समारोप मंदिरात होणार आहे. व त्याच दिवशी सकाळी सात वाजता नंगर तोडण्याचे कार्यक्रम पार पडणार आहे. मानाचा नंगर अण्णासाहेब वळेकर व दुसरा नंगर राजाभाऊ वळेकर असे दोन नंगर दरवर्षी तोडले जातात.व त्या दिवशी दुपारून कुस्त्याचा मोठा कार्यक्रम ठेवला आहे. या ठिकाणी भव्य निकाली कुस्तीचे जंगी नियोजन ठेवले आहे. शेवटची कुस्ती ही 51 हजार रुपयांची होईल त्यामध्ये संतोष जगताप शिरकोली शिवनेरी तालीम अकलूज व सुरेश ठाकूर मध्य प्रदेश तालीम सांगली यांच्यातील लढत होणार आहे. मैदानात एकही कुस्ती फिरवून लावली जाणार नाही व उशिरा आलेल्या पैलवानाचा विचार केला जाणार नाही असा नियम समस्त ग्रामस्थ कमिटीने ठेवला आहे. कोरोणा मुळे गेल्या दोन वर्षापासून यात्रा न  भरल्यामुळे यावर्षी यात्रा जोरदार भरणार आहे कुठल्याही प्रकारची गर्दी व गोधळं न होता यात्रा पार पाडण्यासाठी गावकरी व पंच कमिटी प्रयत्न करणार आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी