दारू पी नाहीतर बिल दे" असे म्हणून सिमेंट ब्लाॅक डोक्यात मारून मित्राला केले जखमी जेऊर टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग वरील हॉटेल साई समोरील घटना
By : Polticalface Team ,26-11-2022
करमाळा: प्रतिनिधी
कविटगाव तालुका करमाळा येथील येसोबा देवाची यात्रा करून परत येत असताना जेऊर येथील साई हाॅटेल मध्ये "दारू तरी पि नाहीतर दारूचे बिल तरी दे", असे म्हणून नकार देणा-या मित्राला खाली पाडून सिमेंट चा ब्लाॅक डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा करमाळा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद दादा श्रीमंत जाधव वय 21 रा. निंभोरे तालुका करमाळा याने करमाळा पोलिसांत दिली आहे. हा प्रकार जेऊर टेभूर्णी रस्त्यावर साई हाॅटेल समोर गुरूवारी (ता.24) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. किशोर गोरख जाधव रा.निभोरे तालुका करमाळा असे संशयित आरोपींचे नाव आहे.
याबाबतची हकीकत अशी की, फिर्यादी दादा श्रीमंत जाधव हा निंभोरे येथे असताना गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या भावकीतील मित्र किशोर गोरख जाधव याने फोन केला की कविटगाव येथे येसोबा देवाची यात्रा आहे त्या यात्रेसाठी साडेचार वाजता मोटरसायकलवर जायचे आहे. त्या अनुषंगाने दोघेही गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कविटगाव येथे यात्रेत सहभागी झाले. त्यानंतर संपूर्ण यात्रेत देवदर्शन करून आनंद घेतल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी किशोर जाधव यांच्या बहिणीचे इथे जेवण केले. त्यानंतर ते निंभोरे या गावाकडे मोटरसायकलवर परत निघाले. प्रवासा दरम्यान संशयित आरोपी किशोर जाधव यांनी "आज थोडी थंडी आहे. आपण दारू पिऊ", असे फिर्यादी दादा जाधव याला सांगितले. त्याप्रमाणे जेऊर येथील साई हॉटेलमध्ये जाऊन संशयित आरोपी किशोर जाधव याने भरपूर दारू प्राशन केली. यावेळी फिर्यादी दादा जाधव याला त्याने सांगितले की ,"तू दारू तरी पी नाहीतर बिल तरी दे", मात्र यावेळी दादा जाधव यांने नकार दिला. त्याला सांगितले की माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी दारू पिणार नाही. अन पैसेही देणार नाही.त्यामुळे यावेळी किशोर जाधव यांने रागाने दादा जाधव याची कॉलर पकडून हॉटेलच्या बाहेर ढकलत नेले व खाली पाडले. त्यानंतर छातीवर बसून हाताने ठोसे मारले. याचवेळी जवळच पडलेल्या सिमेंट ब्लॉक ने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. यावेळी झालेल्या आरडाओरडीने साई हॉटेलचे मॅनेजर व वेटर याने भांडणे सोडवा सोडवी केली. त्यानंतर दादा जाधव याला सोडून मोटरसायकलवर किशोर जाधव हा निघून गेला. अशी फिर्याद दादा जाधव यांनी पोलिसात दिली आहे. याबाबत पोलिसांनी किशोर गोरख जाधव याच्या विरोधात भादवी कलम 323, 324, 504,506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धर्मा साने व प्रमोद गवळी हे पुढील तपास करीत आहेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी