समता हाच संविधानाचा पाया - डॉ. राम ढगे

By : Polticalface Team ,27-11-2022

समता हाच संविधानाचा पाया
-  डॉ. राम ढगे श्रीगोंदा प्रतिनिधी- भारतीय संविधानाचा सर्व नागरिकांना परिचय व्हावा त्याचबरोबर संविधानाचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे. कायद्याचे राज्य, समाजहित, नियम, अधिकार, उद्दिष्टे व मूल्य यांचा प्रचार प्रसार व्हावा.या उद्देशाने संविधान दिन सर्वत्र साजरा करणे गरजेचे आहे. कारण समता हाच संविधानाचा पाया आहे, असे प्रतिपादन राज्यशास्त्र विषयाचे प्रा.डॉ. राम ढगे यांनी केले. 73 व्या भारतीय संविधानानिमित्त संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी भारतीय राज्यघटना व सद्यस्थिती या विषयावरती बोलत होते. अध्यक्षस्थानी कला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश साळवे हे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. महादेव जरे, प्रा. अनंत सोनवणे, डॉ. राजाराम कानडे हे उपस्थित होते. यावेळी डॉ. राहुल गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संविधानाचा व संविधानकर्त्यांचा परिचय देऊन संविधानाला धर्मग्रंथ मानावा, कारण कोणत्याही धर्मापेक्षा संविधानाने प्रत्येक नागरिकांस समान हक्क व अधिकार दिलेले आहेत. माणूस हाच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सामूहिक अभिवादन करून प्रा.डॉ.प्रकाश साळवे यांनी उद्देशिकेचे वाचन केले व ले.कर्नल रत्नाकर झिटे यांनी मूलभूत कर्तव्याचे वाचन केले. यावेळी दिग्विजय भवाळ या विद्यार्थ्याने आपले विचार व्यक्त केले. प्रा. देवेंद्र बहिरम यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले व कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील अध्यापक, कार्यालयीन सेवक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी