वीज बिलावरुन उद्धव ठाकरेंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
By : Polticalface Team ,27-11-2022
मुंबई : वीज बिलावरून उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय. देवेंद्र फडणवीस सत्तेत नसताना त्यांची वीज बिलाविषयीची भूमिका आणि सत्तेत आल्यानंतरच्या भूमिकेवरुन उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यात बोलताना टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक व्हिडीओ ट्विट करून प्रत्यूत्तर दिलंय. काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांचं जुनं विधान ऐकवलंय, त्यावरुन फडणवीसांवर टीका केली. देवेंद्र जनाची नाही मनाची लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना मग वीजबिल माफ करा, वर वेगळी भाषा खालती उतरले की वेगळी भाषा. पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषीत झाले किती लोकांना मिळाले? चॅनलवाल्यांनी हे दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या टिकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील लगेच उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ ट्विट करून काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, असा पलटवार केलाय. 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय्... जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे
वाचक क्रमांक :