By : Polticalface Team ,27-11-2022
पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं या जवानांना येथे पाठवले आहे, अशी माहिती पोरबंदरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी ए.एम. शर्मा यांनी दिली आहे. पोरबंदर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला मतदान होणार आहे.
जिल्हाधिकारी ए. एम. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफचे जवान पोरबंदरपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या तुकडा गोसा गावातील एका केंद्रात थांबले होते. शनिवारी संध्याकाळी एका जवानाने वादातून त्यांच्या साथीदारांवर रायफलने गोळीबार केला. या घटनेत दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जवान जखमी झाले आहेत वाचक क्रमांक :