By : Polticalface Team ,27-11-2022
राज ठाकरे यांच्याकडे तरी किती तक्रारी करायच्या? आणि कुणाकुणाच्या करायच्या? मी अजून बाहेर पडण्याचा विचार केला नाही. मी आहे तिथे आहे. मागे माझ्या मुलाने पान भरून मेसेज केला. तात्या तुम्ही अपमान का सहन करता? असं मुलाने विचारलं, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असतानाच आता मनसेतील नाराजीच्या चर्चा समोर आल्या आहेत. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. वसंत मोरे यांना मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. पण त्यांना भाषणच करू दिलं नाही. त्यामुळे मोरे नाराज असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे पुणे मनसेत सर्व काही अलबेल नसल्याचीही चर्चा सुरू आहे वाचक क्रमांक :