महात्मा फुले यांच्या १३२ व्या स्मृति दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न

By : Polticalface Team ,28-11-2022

महात्मा फुले यांच्या १३२ व्या स्मृति दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता २८ नोव्हेंबर २०२२, पुणे महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारे शिक्षक व विद्यार्थी निर्माण व्हावेत; पुरस्कार वितरण सोहळ्यात मा.खा.राजू शेट्टी यांचे प्रतिपादन स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देशात शैक्षणिक क्रांती करणारे महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारे शिक्षक व विद्यार्थी निर्माण व्हावेत. जसा शेतकरी शेतीची मशागत करतो व मग चांगलं पीक येतं, तसे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारांची मशागत करावी व चांगला समाज, विद्यार्थ्यांचे भवितव्य व पर्यायाने देश घडवावा असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जगदीशब्द फाउंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षक दिन म्हणून जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य व क्रांतीज्योती पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख, पत्रकार श्रीरंग गायकवाड, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, ज्येष्ठ विधीज्ञ विजय कुरले, साहित्यिक नारायण सुमंत, व्याख्याते जगदीश ओहोळ, परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील सर्व जिल्ह्यातून पुरस्कारार्थी निवडण्यात आले होते. शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, आरोग्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण संदर्भात अस्पृश्यांना मोलाचा संदेश देत म्हणाले विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले,असा देऊन अस्पृश्य समाजाला शिक्षणाची दरवाजे खुली करून बहुजन समाज बांधवांना गतिमान वाटचाल सुरू करुन दिली,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश ओहोळ व सूत्रसंचालन जालिंदर राऊत यांनी केले तर आभार महादेव वाघमारे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी