दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने महात्मा फुले, यांच्या १३२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

By : Polticalface Team ,28-11-2022

दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने महात्मा फुले, यांच्या १३२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता २८ नोव्हेंबर २०२२, दौंड तालुका जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने ग्रामपंचायत यवत तालुका दौंड जिल्हा पुणे, येथे सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीला शिवमती सारिका ताई देशमुख, आणि सेवानिवृत्त बबनराव गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका कार्याध्यक्षा, शिवमती सारिका ताई देशमुख या विराजमान होत्या, या वेळी प्रमुख उपस्थितीत बी.बी.चखाले ग्रामविकास सेवक अधिकारी, शिवमती सारिकाताई भुजबळ (जिजाऊ ब्रिगेड,तालुकाध्यक्षा दौंड) शिवश्री भरत भुजबळ जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड, शिवश्री बबनराव गायकवाड,(सेवा निवृत्त पोलीस अधिकारी व जिजाऊ ब्रिगेड कायदा व न्याय सल्लागार, चंद्रकांत गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या प्रसंगी अभिवादन सभेमध्ये मान्यवरांनी सत्यशोधक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर व त्यांच्या कार्यावर मनोगत व्यक्त करत असताना उपस्थितांचे लक्ष वेधले होते, कुंब्यांनी धर्म बाटवला असं म्हणणाऱ्या चतुर्वर्णीय लोकांकडून संबोधले गेले, अस्पृश्य वर्गाला पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून दिला, अस्पृश्य मुलींची पहिली शाळा सुरू केली, महिलांना शिक्षणाचे दरवाजे खुली केली, लग्न वरातीमध्ये सामिल झाल्याने पारा चढला होता, त्या वेळी शनिवार वाड्याच्या बुडाला आग लागली होती, गोविंदराव तुझ्या पोरानी धर्म बाटवला हे कदापि खपवून घेतले जाणार नाही हं,, असे म्हणून डांगोरा पीटण्याचे कार्य चातुरवर्णीयांनी केले होते, जोतिबांच्या कार्याचा त्यांनी चांगलाच धसका घेतला होता, मनुवादी प्रवृत्तीला मुठ माती देण्याचे कार्य जोतिबांनी जोमाने सुरु केले होते, अखेर समाजावर दबाव टाकुन सत्यशोधक चळवळीला खिळ घालण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात होता, भोळ्या बापड्या समाजाने चतुरवर्णीय यांचे ऐकून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, माई सावित्रीबाई फुले, यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता, मात्र या प्रसंगी न डगमगता फुल्यांनी थेट शनिवार वाड्या शेजारील गंजपेठेतील मुस्लिम बांधवांच्या रुम नं ३९५,खोलिमध्ये भिडे वाड्यात वास्तव्यास फुले आपत्य राहण्यासाठी आले, याच ठिकाणी नाकावर ठेचून, अस्पृश्य मुलींची पहिली शाळा सुरू करुन चातुरवर्णीय शनिवार वाड्याच्या बुडाला आग लावली होती, असे परखड व निर्भिड विचार सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन चरित्रावर बोलताना आज अंगावर शाहरे येतात, तर साक्षात त्या वेळी सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी निडरपणे सत्यशोधक लढा उभारला आज आपण त्यांचे विचार मांडण्याला सुद्धा परिपूर्ण व परखड मत व्यक्त करत नाही, हे मोठे दुर्दैव असल्याचे बोलताना सांगितले, या वेळी बापू जगताप दत्ता ताम्हणे,साजन गायकवाड, संदीप गायकवाड, सतीश गायकवाड, बाळू जाधव, बाळू मोरे, संतोष मुळे ऋतिक काळे, बाळासाहेब काळे, मल्हारी बीचुकले, तसेच यवत ग्रामपंचायत कर्मचारी, उत्तम कांबळे, सुनील सावळे, सचिन पवार, आदी मान्यवर उपस्थित होते, ग्रामपंचायत यवत समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष