By : Polticalface Team ,29-11-2022
लग्नाला घरच्यांचा विरोध घटनेबाबत माहिती अशी की माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या तरुणीचे तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या तरुणा सोबत प्रेम संबंध जुळले. मात्र लग्नाला दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध असल्यानं त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. मात्र ते दोघे घरातून पळून गेल्यानंतर मुलीची आई सुनिता चव्हाण आणि भाऊ मयूर चव्हाण हे दोघे प्रियकराच्या घरी जाऊन त्याचा भाऊ विकास राजेंद्र वाबळे वय 27 वर्ष आणि आई वडिलांना त्रास देऊ लागले, दमदाटी करू लागले. मुलाला घरी बोलून घ्या असं ते वारंवार म्हणू लागले. मात्र मुलाच्या नातेवाईकांना मुलगा कुठे गेला हे माहित नसल्यानं ते हतबल होते. तसेच त्यांनी भीतीमुळे तक्रार देखील दाखल केली नव्हती .
त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुलीचा भाऊ मयूर चव्हाण व तिची आई सुनिता चव्हाण हे परत आपल्या मुलीच्या प्रियकराच्या घरी गेले. मुलाला आमच्यासमोर हजर करा म्हणून दमदाटी केली . तेंव्हा मयूर चव्हाण याने प्रियकराचा भाऊ विकास वाबळे याच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. या घटनेत विकास जखमी झाला. त्याला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सुनिता चव्हाण व मुलीचा भाऊ मयूर चव्हाण यांना अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. घटनेनंतर संबंधीत तरुण, तरुणी पोलीस स्टेशनला हजर झाले आहे , त्यांनाही पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. वाचक क्रमांक :