डॉक्टरांची झंजट संपली; तुकाराम मुंढेंची उचलबांगडी करण्यात यश?

By : Polticalface Team ,30-11-2022

डॉक्टरांची झंजट संपली; तुकाराम मुंढेंची उचलबांगडी करण्यात यश? मुंबई : गरीब व सामान्यांसाठी काम करणारे व कार्यक्षम अधिकारी असा नाव लौकिक असलेले भारतीय प्रशासन अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरुन मुंढेंची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीमुळे आता डॉक्टरांच्या मागील झंजट संपली आहे. मात्र कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही.

आरोग्य संस्थांना अचानक भेटी, मुख्यालयी न राहणाऱ्यांना वेतनकपात व घरभाडे कपातीच्या नोटीसा, २४ तास ड्युटी करा, इंटर्नशिप करणाऱ्यांनीही ड्युटी करावी लागेल, अशी नियमानुसार शिस्त घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे यांना डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यानंतर आता मुंढेंची बदली झाली आहे.

खात्यांतर्गत राजकीय वर्तुळातही त्यांच्याबद्दल रोष टोकाला गेल्याने त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची आज बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदली आदेशामध्ये म्हटले आहे की, शासनाने आपली बदली केली असून आपण आपल्या आयुक्त, कुटुंबकल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा कार्यभार प्रधान सचिन, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडे आणि आपल्याकडे अतिरिक्त स्वरुपात सोपविण्यात आलेल्या प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या पदाचा कार्यभार प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे व पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी, असे म्हटले आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले तुकाराम मुंढे जिल्ह्यातील ताडसोन्ना येथील रहिवाशी आहेत. शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची प्रशासनात ख्याती आहे. त्यांच्या शिस्तीच्या बडग्यामुळे प्रशासन ताळावर येते आणि संबंधीत खात्याचा लाभ तळागळापर्यंत पोचतो. मात्र, त्यामुळे मग मुंढे स्थानिक सत्ताधाऱ्यांपासून खात्यालाही नकोसे होतात असा पुर्वानुभव आहे.

त्यांचे व सत्ताधाऱ्यांचे खटके उडाल्याने त्यांच्या कायम बदल्या होतात आणि त्यांच्या समर्थनार्थ सामान्य लोकांचा त्यांच्या भूमिकेला पाठींबा मिळाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी खात्याची आरोग्य सेवा सामान्यांपर्यंत पोहचवतील या भावनेने त्यांची आरोग्य अभियान आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. मात्र, रुजू होताच तुकाराम मुंढे यांनी अगोदर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्याचे काम हाती घेतले आणि त्यांना फटका बसला.

यासाठी रात्रीच्या वेळी अचानक आरोग्य संस्थांना भेटीचे सत्र सुरु झाले होते. मुख्यालयी न आढळणाऱ्यांना नोटीसा, त्यांचे घरभाडे भत्ता कपात करण्याचे आदेश, इनर्टनशिप करणाऱ्यांनी ड्युटीच केली पाहीजे यासाठी प्रयत्न, प्रतिनियुक्त्या बंद करा असे एक ना अनेक आदेश दिले. त्यामुळे उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या आणि कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला सोयीनुसार चक्कर मारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडायला सुरुवात झाली होती. अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मुंढेंच्या निर्णयांना विरोधासाठी काळ्या फिती, सोशल मिडीयावर मतमतांतरे सुरु केली होती.

दरम्यान, खात्यात मंत्र्यांपेक्षा मुंढेंचीच चर्चा अधिक सुरु होती. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा फटका भविष्यात बसण्याची भितीही निर्माण झाली होती. दरम्यान, तसे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे आणि सत्तांतरापूर्वीच्या गुवहाटी दौऱ्यात मोलाचा वाटा उचलणारे आहेत. त्यांनाही मुंढे नकोसे झाल्याची चर्चा होती. त्यामुळे दहाएक दिवसांपूर्वी मंत्र्यांनी अनेक जिल्ह्यांतील जेष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून मुंडेंबद्दल माहिती घेतली होती. मुंढेंच्या शिस्तीमुळे काम व ताण वाढल्याने सहाजिकच अधिकाऱ्यांनीही नाराजीचाच सुर आळवला.

त्यानंतर चार दिवसांनी मंत्री सावंत यांनी बोलावून मुंढेंना काही सुचनाही दिल्या होत्या. तेवढ्यावर न थांबता मुंढे आपल्या खात्यात नकोत, असा आग्रहच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला होता. त्यानंतर शिंदेही राजी झाल्याची माहिती होती. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या प्रक्रीयेला वेग आला होता. मुंढे अल्पकाळच टिकतात असे जुने अनुभव असले तरी ते आरोग्य विभागात रुजू होऊन पुरते दोनेक महिनेही झाले नाहीत. तोच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.