ग्राम विकासाची चळवळ बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवा,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे आवाहन

By : Polticalface Team ,30-11-2022

ग्राम विकासाची चळवळ बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवा,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे आवाहन करमाळा प्रतिनिधी ग्रामविकासाची चळवळ बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूका लढवा, असे आवाहन आज माजी आमदार नारायण पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पाटील यांचेशी संवाद साधला असता पाटील गटाकडून सर्व गावात आमच्या विचारांचे कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगण्यात आले.याबाबत अधिक स्पष्ट बोलताना त्यांनी सांगितले की स्थानिक पातळीवर कार्यकर्ते सक्रीय असून युवकांचा या निवडणूकीत मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. ग्रामविकास चळवळ बळकट करण्यासाठी अनूभव व उर्जा या दोन्ही गोष्टी एकत्रीतपणे आल्यास चांगले चित्र निर्माण होईल. गावपातळीवरही आता विकासाचा मुद्दा गडद होत असल्याने या निवडणूका आगामी मोठ्या निवडणूकांची दिशा ठरवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या शिंदे -फडणवीस सरकारकडून पाठपुरावा करुन ग्रामविकासास पुरक कामांसाठी पुरक निधी मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तसेच गायरान अतिक्रमण न हटवणे, वीजपुरवठा, दळणवळण व आरोग्य आदि विषयांबाबतही आपण महत्वाची भूमिका स्पष्ट करुन अनेक रखडलेल्या कामांची पुर्तता व्हावी म्हणुन आग्रही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.तर मागील ग्रामपंचायत निवडणूक टप्प्यात माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालूक्यात दोनशेहून अधिक सदस्य निवडून आले होते. चालू ग्रामपंचायत निवडणूक टप्प्यात सुद्धा पाटील गटाचे सर्वाधिक उमेदवार सदस्य तसेघ जनतेतुन सरपंच या पदावर निवडून येतील असा ठाम विश्वास गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी व्यक्त केला.करमाळा तालूक्यात सध्या तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया चालू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी अर्ज छानणी तसेच माघार घेण्याची अंतिम मुदत असल्याने त्यानंतर खरे राजकीय चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी प्रत्येक राजकीय गटाकडून पॅनल पुर्ण करणे, आरक्षीत जागांवर उमेदवार उभे करणे, जनतेतून सरपंच पद असल्याने तगडा उमेदवार उभा करणे आदि बाबींवर भर दिला जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.