By : Polticalface Team ,30-11-2022
ते म्हणाले मी हातात बांगड्या घातल्या नाही आणि मी हतबलही झालो नाही. मी लढणारा आहे रडणारा नाही. राज्यपालांवर कुणीही बोलण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे मी राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आवाज उठवण्याचे ठरवले. या आधीच्या पत्रकारपरिषदेत मी रडलो नाही. भावना फक्त अनावर झाल्या होत्या.
मी रडणाऱ्यांपैकी नाही. मी लढणारा आहे. आता लढणारच नाही तर दाखवणार आहे. शिवरायांच्या नावाचा वापर राजकारणासाठी होत आहे. चित्रपट, लिखानातून शिवरायांचा अवमान केला जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.
उदयनराजे म्हणाले, क्षणभर सत्तेत राहण्याला मी महत्व देत नाही. आपली भूमिका राजकीय पक्षांनी स्पष्ट करा आणि सर्वधर्म समभावाचा खुलासा करावा. देशाची फाळणी झाली त्यातून काय मिळाले. शिवरायांच्या विचारांचा विसर पडला तर जबाबदार कोण तर हीच लोक राहील.
दरम्यान, प्रत्येक राज्याचा प्रमुख काहीही विधाने करीत आहेत. आपण खपवून घेणार आहो का प्रत्येक पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. काहीही वक्तव्य शिवरायांबद्दल करायचे हे आज नाही आधीपासून सुरू आहे. आपण कोडगे झालो आहोत का? एक तर शिवरायांबद्दल भूमिका स्पष्ट करा अन्यथा नाव घेऊ नका, असंही ते म्हणाले आहेत वाचक क्रमांक :