पुरंदरेंविरोधात आम्ही बोललो तेव्हा जातपात लक्षात आली नाही का? जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

By : Polticalface Team ,01-12-2022

पुरंदरेंविरोधात आम्ही बोललो तेव्हा जातपात लक्षात आली नाही का? जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर ठाणे : जेम्स लेनने ज्या पुस्तकाद्वारे शिवाजी महाराजांच्या पितृत्वाबद्दल शंका निर्माण केली. लेले, मेहंदळे, भंडारी यांनी जेम्स लेनला माहिती दिली, या सर्वांनी आमच्या आईची चुकीची माहिती द्यायची, महाराजांची बदनामी करायची आणि त्या सर्वांची तुम्ही जाऊन माफी मागीतली होती, यालाच जातपात म्हणतात, असे प्रत्त्युत्तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.

जात-पात-धर्म हे कुठल्या निकषांमध्ये मोजले जातात हेच मला कळत नाही. राष्ट्रवादीचा जन्म 1999 साली झाला. जेम्स लेनने 2003 मध्ये शिवाजी महाराजांच्या पितृत्वावर शंका निर्माण केली. त्या जेम्स लेनला लेले, मेहेंदळे, भंडारी यांनी माहीती दिली. त्यांची राज ठाकरे यांनी जाऊन माफी मागितली, असं आव्हाड म्हंटले आहेत.

जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस करीत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राष्ट्रवादी कॉंगेसवर झालेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.

बाबासाहेब पुरंदरेंविरोधात आम्ही बोललो तेव्हा तुम्ही पुरंदरेंची बाजू घेतली. तेव्हा तुम्हाला जातपात लक्षात आली नाही का? हर हर महादेवमध्ये अतिशय विकृत चित्रण दाखवण्यात आले. तुम्ही शिवाजी महाराजांची बुद्धी, शौर्य या सर्वावर पाणी टाकले.

नवीन एक जात, वर्ण, वर्चस्ववादाला सुरुवात केली, बाजीप्रभू देशपांडे महाराजांच्या तुलनेत होते आणि त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असे या चित्रपटात दाखवले. या चित्रपटाला तुम्ही पाठिंबा दिलात. मग कोणी जातीपातीचे राजकारण केले? सत्य लोकांसमोर यायला हवे, असंही ते म्हणाले आहेत

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी