By : Polticalface Team ,01-12-2022
पुढे बोलताना तपासे म्हणाले, निवडणूका आल्या की शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही, हे समीकरण राज ठाकरे यांना कळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पवार नाव घेत नाही असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. ते त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे, लोकांची दिशाभूल करणारे आहे. पवारांचे व्यक्तीमत्व काय आहे हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, असे तपासे म्हणाले.
तसेच शिवरायांच्या अपमानावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका वक्तव्याचा तपासे यांनी समाचार घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाच. आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी केलेले बंड हे शिवरायांच्या गनिमी काव्यासारखे होते असे वादग्रस्त वक्तव्य केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि फितुरी यातील फरक आमदार संजय गायकवाड यांना कळतो का? असा संतप्त सवाल करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध तपासे यांनी केला आहे. तसेच शिवरायांचा अपमान करण्याची मालिका भाजपने व शिंदेसरकारने स्विकारली का अशी शंका आता जनतेच्या मनात येत आहे असेही महेश तपासे म्हणाले वाचक क्रमांक :