2017 पासुन फरारी आरोपी पकडला: दोन दिवस पोलिस कोठडी करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

By : Polticalface Team ,02-12-2022

2017 पासुन फरारी आरोपी पकडला: दोन दिवस पोलिस कोठडी करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी करमाळा: प्रतिनिधी करमाळा पोलिसांनी गेल्या 2017 -18 पासून खून करून दरोडा प्रकरणी फरार असलेल्या आरोपीस सापळा रचून जिंती येथे भरचौकात मुसक्या आवळल्या . श्रीमंगल ज्ञानदेव काळे वय 38 रा भगतवाडी तालुका करमाळा असे या पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे या आरोपीस करमाळा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एखे यांच्यासमोर उभे केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबतची हकीकत अशी की संशयित आरोपी श्रीमंगल काळे हा जिंती येथे आल्याची खबर करमाळा पोलिसांना खब-या मार्फत मिळाली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासुन वेष बदलून पोलिस जिंती परिसरात दबा धरून बसले होते. जिंती बाजारात तो महिलासह जात असताना पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले.यावेळी त्यांने पोलिसाबरोबर झटापट करून त्यांने सुटण्यासाठी प्रयत्न केला.गावक-यानीही बघ्याची भूमिका घेतली. तब्बल अर्धा तास झटापट झाली मात्र करमाळा पोलिसांनी त्याला जेरबंद केले. ही कामगिरी पोलिस निरिक्षक ज्योतीराम गुजंवटे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत ढवळे, अमोल जगताप, सोमनाथ जगताप, अजित उबाळे, भोजणे आदिनी केली.या संशयित आरोपीं कडून घरफोडी , दरोडे सारखे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे घरफोडी करून एकाचा खून करून श्रीमंगल हा फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो बारामती, कर्जत , श्रीगोदा,करमाळा आदि ठिकाणच्या गुन्ह्यात तो संशयित आरोपी आहे.त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याचा तपास पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुजंवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष देवकर हे करत आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी