जिथे मी चुकत नाही तिथे मी झुकत नाही- खासदार ओमराजे निंबाळकर

By : Polticalface Team ,03-12-2022

जिथे मी चुकत नाही तिथे मी झुकत नाही- खासदार ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद - पीकविम्याच्या मुद्द्यावरून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातच खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. दोघांतील या बाचाबाचीने परिसरातील वातावरण काही काळ तापलं होतं. तू जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा, तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना सुनावलं होतं.

याबाबत ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मिडियावर लिहिले आहे की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा बाबतीत न्याय भेटावा म्हणून मी व माझे सहकारी आमदार कैलास पाटील लढा देत आहोत. यामागे एकच हेतू की भरडलेल्या शेतकरी बांधवांना न्याय मिळावा. याबाबतीत समोरील आमदार ह्यांना करायचे काही नाही पण श्रेय घ्यायचे आहे. त्यांनी कितीही आटापिटा केला तरी जनता दूधखुळी नाही व ती सगळे पाहत आहे.

आज कलेक्टर कचेरीत याबाबतीत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना त्या आमदाराने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने विषयाला फाटा द्यावा म्हणून वैयक्तिक मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. "सोन्याचा चमचा" घेऊन व आजूबाजू चमचे मंडळी ठेऊन त्यांना सर्वांवर रुबाब करायची सवय आहे परंतु त्यांचा सामना आज या "पवनराजे" साहेबांच्या मुलाशी झाला आणि आगीशी का खेळू नये हे आता त्याला नक्कीच कळले असेल. यांनी संस्कार बद्दल बोलावे म्हणजे पाकिस्तानने दहशवाद्यांविरोधात बोलावे असे आहे, असा टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

लोकशाहीत जनता हीच खरी राजा असते, आता लोकांच्या जहागिरी व जहागीरदारी दोन्ही संपल्या आहेत. तुम्ही दहशतीने आम्हाला दाबाल व आम्ही दबू असा गैरसमज आज मिटला असेल. राजकारणात लोकांच्या साठी राजकारण करताना मी कायमच वैयक्तिक हेवेदावे टाळत असतो, आम्ही शांत असतो पण षंढ नसतो. आज समोरच्याला कळेल या भाषेत समजाविले इथून पुढेही गरज पडेल तेव्हा लोकांसाठी कोणालाही कधीही भिडायला आम्ही तयार आहोत, फक्त यांची समोरासमोर करायची नव्हे तर गुपचूप पाठीमागे करायची सवय आहे हे ही मी आणि राज्यातील जनता जाणून आहे, असे ओमराजे निंबाळकर म्हणाले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी