By : Polticalface Team ,04-12-2022
मल्हार पाटील म्हणाले, ओम्या आज तू लई बोलला, औकाती पेक्षा लई जास्त बोलला राणा दादा तिथे कॅमेरा व जिल्हाधिकारी होते म्हणून दादांनी नमतं घेतलं. पण तू कोण बोलणारा तुझी औकात काय ? आम्ही खानदानी लोक आहोत आम्हाला संस्कार आहे. मात्र तू बोलला म्हणून मला बोलावं लागू राहील.
तुझ्याविषयी बोलताना मला लाज वाटते. तुझं राहत घरमी शेती, पुण्यातील फ्लॅट हे माझ्या आजोबाने तुला दान केलं. तू कोणाची औकात आणि संस्काराविषयी बोलतो. राणा दादा सारखा माणूस जिल्ह्याला मिळाला हे नशीब आहे. लोकांनी राणा दादा यांना आपलस केलं त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे.
तुझं राहणं, खाणं मुंबईत पोरींबरोबर फिरणं हे काय जनतेला माहिती नाही. म्हणूनच जास्त बोलायला लावू नकोस, तुझ्या सगळ्या गोष्टी पाटील कुटुंबाला माहिती आहे. माझे वडील आणि आजोबांमुळे आम्ही सांगळे शांत आहोत. राणा दादांचे संस्कार आहे म्हणून शांत आहे, मात्र यापुढे जर वळवळ केली तर गाठ मल्हार पाटलांशी आहे, अशा शब्दात मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना थेट आव्हान दिले आहे. वाचक क्रमांक :