दौंड तालुक्यातील मौजे मिरवडी ग्रामपंचायतीचा विद्यार्थ्यांसाठी आगळा वेगळा उपक्रम,(मी कसा घडलो) विविध पदाधिकारी यांचा संवाद व मार्गदर्शन

By : Polticalface Team ,05-12-2022

दौंड तालुक्यातील मौजे मिरवडी ग्रामपंचायतीचा विद्यार्थ्यांसाठी आगळा वेगळा उपक्रम,(मी कसा घडलो) विविध पदाधिकारी यांचा संवाद व  मार्गदर्शन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड, ता,०५ डिसेंबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे मिरवडी ग्रामपंचायत विविध पुरस्कारांनी सन्मानीत आहे, आर आर आबा पाटील, स्मार्ट ग्राम पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वाध्याग्राम पुरस्कार, आदर्श कृषीग्राम पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या ग्रामपंचायतीच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम गावात सुरू करण्यात आला आहे, शनिवार दि,०३ डिसेंबर २०२२,रोजी मौजे मिरवडी ता दौंड जिल्हा पुणे, लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब बहुउद्देशीय सभागृहात, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, गावातील प्राथमिक व उच्च शिक्षित इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, विविध क्षेत्रातील नामवंत कर्तबगार, व्यक्तिमत्व प्राप्त असलेल्या व्यक्तींचे महत्वपूर्ण मार्गदर्शन व संवाद साधण्याचा उपक्रम दर शनिवारी राबविण्यास सुरुवात केली असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थीची संख्या वाढत चालली आहे.

युवा तरुण पिढीच्या हाती देशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे भाकित ओळखुन सामाजिक उच्च शैक्षणिक उद्योजिक युवा तरुणांचे शैक्षणिक विद्यार्थ्यांचे प्रत्येक पाऊल प्रगतीकडे वाटचाल सुरू व्हावी, गावातील विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण अभ्यासक्रम घडवण्याच्या दृष्टीने, मी कसा घडलो हा उपक्रम राबविला जात आहे, खऱ्या अर्थाने विद्यार्थीना बाह्य जगाची ओळख निर्माण व्हावी, यासाठी विविध क्षेत्रातील उच्च शिक्षित पदाधिकारी नामवंत मान्यवरांन मार्फत मार्गदर्शक व संवाद घडवून आणला जात आहे, उच्च शिक्षित नामवंत पदाधिकारी मी कसा घडलो या संदर्भात दर शनिवारी विद्यार्थीना विशेष संवाद साधण्याची संधी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली असल्याने, शनिवार दि ०३ रोजी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे विशेष संवाद साधण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती, या प्रसंगी दीड ते दोन तास विद्यार्थ्यांनी अतिशय महत्वपूर्ण निडर संवाद साधण्याचा आनंद व्यक्त केला, या वेळी पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील शैक्षणिक घडामोडी पासून ते पोलिस निरीक्षक अधिकारी पदा पर्यंत मोठ्या मेहनतीने पोचलो असल्याचे त्यांनी अनेक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.

या वेळी त्यांनी मुलांच्या विविध प्रश्नाचे अचूक उत्तरे देऊन मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक दृष्ट्या महत्वपूर्ण मार्गदर्शन करुन सर्वांना मी कसा घडलो या संदर्भात माहिती दिली, मौजे मिरवडी ग्रामपंचायत प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित कर्तबगार व नामवंत व्यक्तींमार्फत संवाद व मार्गदर्शन मिळण्या बाबत हा उपक्रम राबविण्यात आला होता, तसेच भविष्यात विद्यार्थी आपले ध्येय सफल साधण्यासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी उद्योजक, खेळाडू, समाज सेवक, डॉक्टर, वकील, पोलीस निरीक्षक, एमपीसी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, न्यायाधीश, असे अनेक उच्च दर्जाचे क्लास वन पदाधिकारी निर्माण व्हावेत, यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक प्रवक्ते यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आयुष्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे, या संदर्भात विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होऊन कर्तबगार पदाधिकारी होण्याची भावना मनात निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही, तसेच तालुकास्तरावर शैक्षणिक अभ्यासक्रमाला गती मिळुन विद्यार्थीना चांगले क्रमांक पटकावण्यात यश प्राप्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन, मौजे मिरवडी ग्रामपंचायत पदाधिकारी दूरदृष्टी ठेवून लक्षपूर्वक कार्य पार पाडत आहे, या वेळी यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते, नौशाद रजिस शेख, व अमर उमेश शेलार, यां विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, या प्रसंगी सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते जेष्ठ नागरिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष