By : Polticalface Team ,05-12-2022
दरम्यान चिमुकलीवर अत्याचार करणारा तरुण उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समजताच पोलिसांनी तात्काळ हालचाली करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
अधिक माहिती अशी की, ही चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत होती. ही संधी साधून 21 वर्षीय आरोपीने या चिमुकलीला आपल्या घरात बोलावून नेले. त्यानंतर आरोपीने या चिमुकलीवर अत्याचार केला. पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्वेमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.
बोईसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली वाचक क्रमांक :