जिल्हापरिषद , पंचायत समिती करमाळा यांचे ॲडव्होकेट पॅनल पदी ॲड. शहानुर अहमद सय्यद यांची निवड
By : Polticalface Team ,05-12-2022
करमाळा: प्रतिनिधी
जिल्हापरिषद सोलापुर, पंचायत समिती करमाळा यांचे ॲडव्होकेट पॅनल पदी करमाळा वकील संघाच्या माजी अध्यक्षा ॲड. शहानुर अहमद सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील मॅडम यांनी अॅड.शहानुर सय्यद यांना पत्र दिले आहे. अॅड सय्यद या करमाळा न्यायालयात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कायदेविषयक कामकाज अधिकृतरित्या पाहणार आहेत. प्रथमच महिला प्रतिनिधी ला विधी सल्लागार पदी संधी मिळालेली आहे. त्यामुळे या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे . ॲड. शहानुर अहमद सय्यद यांनी यापुर्वी सोलापूर जिल्हा महिला बालकल्याण समितीवर तब्बल तीन वर्षे, 2016 पासुन महिला नोटरी म्हणून तर आदिनाथ मकाई कारखान्यावर व स्टेट बँक ऑफ इंडिया येथे प्रथमच महिला विधी सल्लागार म्हणून यशस्वी पणे काम पाहीलेले आहे. त्याच्या या नेमणुकीचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्याच्या या निवडीचे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे, करमाळा पंचायत समिती चे गटविकासाधिकारी मनोज राऊत तसेच करमाळा वकील संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. सध्या अॅड शहानुर सय्यद या करमाळा न्यायालयात कामकाज पहात आहेत.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
वाचक क्रमांक :