ग्रामीण भागातील पी एम पी एल बस सेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

By : Polticalface Team ,06-12-2022

ग्रामीण भागातील पी एम पी एल बस सेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौड ता,०५ डिसेंबर २०२२, ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पी एम पी एलची बस सेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, पी एम पी एलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली. या संदर्भात बोलतान आमदार राहुल कुल म्हणाले की कोरोना काळा नंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पी एम पी एल बस प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर बस सेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्या नंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा देखील सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पी एम पी एल प्रशासनाकडे लेखी पत्र देऊन सदर मार्गांवरील बस सेवा बंद करण्याची विनंती केली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पत्रानंतर ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील बससेवा टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय पीएमपीएल बस प्रशासनाने घेतला होता. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ११ मार्गांवरील बस सेवा बंद करण्याचा निर्णय बस प्रशासनाने घेतला होता, तसेच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून १२ मार्गांवरील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता पी एम पी एल प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्या टप्प्याने अंमल बजावणी करण्यात येत होती‌. मात्र ग्रामीण भागातील पी एम पी एलची बस सेवा सुरू ठेवण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत असल्याने या मागणीचा विचार करून, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना या बाबत माहिती देत पी एम पी एल ही बस सेवा सुरू ठेवणे अतिशय गरजेचे असल्याची विनंती करुन तत्काळ बस सेवा सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे, त्या नुसार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यानीही नागरिकांच्या या मागणीला समर्थन करीत प्रवासी नागरिकांची दखल घेऊन, पी एम पी एलचे संचालक ओम प्रकाश बकोरिया यांना आज (दि.५) रोजी भेट घेऊन ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही आमदार कुल यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी