स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 वा महापरिनिर्वाण दिन साजरा
By : Polticalface Team ,06-12-2022
अमोल गायकवाड- वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेमध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै नानासाहेब मदने तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड सामाजिक कार्यकर्ते सिताराम खुडे नाभिक समाज संघटनेचे वडगाव निंबाळकरचे सचिव पांडुरंग पवार, वैभव साळवे प्रशालेचे प्राचार्य डी ए बनकर व शिक्षक- शिक्षिका आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी बारामती तालुका बहुजन हक्क परिषदेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनचे अवचित साधून जनता शिक्षण संस्थेचे स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेला रोख स्वरूपाची देणगी देण्यात आली. हे देणगी प्राचार्य डी ए बनकर यांनी स्वीकारली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी बी चौगुले यांनी केले तर आभार बी जी शिंदे यांनी मानले.
वाचक क्रमांक :