पुणे : भारतीय सैन्यदलाच्या येथील दक्षिण मुख्यालयाच्या वतीने महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशसेवेसाठी लष्करात महिलांना संधी मिळावी तसेच त्यांना देशसेवेची जबाबदारी पार पाडता यावी, याअनुषंगाने हा मेळावा होत आहे.
ही भरती प्रक्रिया अग्निवीर भरती प्रक्रियेअंतर्गत मंगळवार (ता. 6) ते रविवार (ता. 11) या कालावधीत खडकी येथील बीईजी अँड सेंटर येथे पार पडणार आहे. यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दमणमधील तरुणींना सहभागी होता येणार आहे.
परीक्षा 3 टप्प्यात होणार
ही भरती प्रक्रिया शारीरिक, वैद्यकीय व लेखी परीक्षा अशा तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे.शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा देता येणार आहे. तसेच गुणवत्तेवर आधारित अंतिम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना भारतीय सैन्य दलात लष्करी पोलिस विभागात अग्निवीर म्हणून दाखल केले जाणार आहे.
वाचक क्रमांक :