By : Polticalface Team ,06-12-2022
त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे नेते होते. त्यांनी शेकडो वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या वंचितांसाठी यशस्वी लढा दिला. त्यांना कोटी कोटी प्रणाम, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो, मानतो, जगासमोर मांडतो. पण महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी आज मला पुन्हा सांगावंसं वाटतं की आपल्या महापुरुषांचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे.
या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महामानवास अभिवादन करण्यात आले. यावेळी मंचावर प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते वाचक क्रमांक :