हिवाळी अधिवेशनावर २२ डिसेंबरला राज्यातील पोलीस पाटलांचा मोर्चा धडकणार, अनेक मागण्या प्रलंबित असल्यामुळे पाटिल संतत्प

By : Polticalface Team ,07-12-2022

हिवाळी अधिवेशनावर २२ डिसेंबरला राज्यातील पोलीस पाटलांचा मोर्चा धडकणार, अनेक मागण्या प्रलंबित असल्यामुळे पाटिल संतत्प प्रतिनिधी पुणे जिल्हा सह अनिल गायकवाड, राज्यातील पोलीस पाटीलांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मागण्यांसाठी अनेकदा निवेदन देण्यात आली मात्र सरकारने गंभीरतेने विचार केला नाही. दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघ तसेच इतर संघटना आक्रमक झाल्या आहे. दिनांक 22 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर राज्यातील हजारो पोलीस पाटील धडक देणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आणि राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील यांनी केले आहे. राज्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आणि राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील परीश्रम घेत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मागण्या प्रलंबित असल्यामुळे त्यांनी संपुर्ण राज्यभर दौरे करुन पोलीस पाटीलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र संपुर्ण राज्यभरातील पोलीस पाटील एकवटले असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहे. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून दरमहा किमान 18 हजार रुपये मिळावे, निवृत्तीचे वय साठ वर्षा वरून 65 वर्षांपर्यंत करण्यात यावे, निवृत्तीनंतर किमान पाच लाख रुपये ठोस रक्कम मिळावी, ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे, नूतनीकरण पहिल्या पाच वर्षानंतर कायमचे बंद करण्यात यावे, गृह व महसूल विभागातील पद भरती करताना पोलीस पाटलांना प्रत्येकी पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा, शासनातर्फे पोलीस पाटलांचा पाच लाख रुपयाचा विमा उतरण्यात यावा आणि त्यांचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावे, शासनाकडून पोलीस पाटलांना व त्यांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेम मिळावा तसेच कार्यरत पोलीस पाटील मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस पाटील म्हणून अनुकंपा तत्त्वावर घेण्यात यावे, प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा तीन हजार रुपये मानधनासोबतच मिळावेत, पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटलांना त्यांच्या निवृत्ती काळापर्यंत कायम ठेवण्यात यावे, गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित जिल्ह्यामध्ये एखादा पोलीस पाटील मरण पावल्यास त्या पोलीस पाटलास कुटुंबीयांना नोकरी आणि वीस लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावे अशा महत्वपूर्ण मागण्या घेऊन राज्यातील पोलीस पाटील अधिवेशनावर धडक देणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघ राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ राज्य अध्यक्ष मोहनराव शिंगटे अण्णा, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील फाउंडेशन राज्य अध्यक्ष राजकुमार यादव पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील अमरावती अध्यक्ष प्रफुल गुल्हाने पाटील., निरंजन गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंखे पाटील, कार्यकारी अध्यक्ष भृंगराज परशुरामकर पाटील, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राव महाजन पाटील, राज्य संघटक बळवंत काळे पाटील, राज्य संघटक नवनाथ धुमाळ पाटील, राज्य सहसचिव गोरखनाथ टेमकर पाटील, खानदेश विभाग प्रमुख दादासाहेब कारभोर पाटील, कोकण विभाग अध्यक्ष साईनाथ पाटील, महिला आघाडी महाराष्ट्र राज्य प्रमुख, नागपूर विभाग अध्यक्ष विजय घाडगे पाटील, नागपूर जिल्हा अध्यक्ष रितेश दुरूगकर पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र भामद्रे पाटील, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव साठवणे पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष रविशंकर ढोले पाटील, वाशिम जिल्हा अध्यक्ष राठोड पाटील, वर्धा जिल्हा अध्यक्ष ढोकणे पाटील, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित खोत पाटील, कोकण विभागीय कार्याध्यक्ष डी एस कांबळे पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे पाटील, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते पाटील, मराठवाडा विभागीय सचिव महादेव भालेराव पाटील, मराठवाडा विभाग अध्यक्ष जब्बार पठाण, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष योगेश मते पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष रामकृष्ण तायडे पाटील, निरंजन गायकवाड पाटील तसेच सर्व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे. पोलीस पाटील पद हे गावातील महसूल आणि गृह विभागाचा महत्त्वाचा कणा मानला जातो. राज्यातील सर्व पोलीस पाटील गेल्या अनेक वर्षापासून गावातील सर्व माहिती शासनाला पुरवणारा एक दुवा म्हणून काम करत आहे. असे असतांना त्यांच्या प्रलंबीत मागण्यांकडे सरकार गंभीरतेने बघायला तयार नाही. त्यामुळे आम्हाला मागण्या मंजुर करुन घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही अशी प्रतिक्रिया. निरंजन गायकवाड पोलीस पाटील, यवतमाळ यांनी व्यक्त केले आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.