करमाळा तालुक्यातील आता एकूण 28 ग्रामपंचायती च्या राजकीय आखाडा ऐन थंडीत पेटला

By : Polticalface Team ,09-12-2022

करमाळा तालुक्यातील आता एकूण 28 ग्रामपंचायती च्या राजकीय आखाडा ऐन थंडीत पेटला करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील आता एकूण 28 ग्रामपंचायती च्या राजकीय आखाडा ऐन थंडीत पेटला असून येऊ पाहणाऱ्या 18 डिसेंबर रोजी मतदान असून कोणता गट या राजकीय आखाड्यात विजय होणार याकडे तालुका वाशी येथे लक्ष लागून राहिले आहे यामध्ये तालुक्यातील प्रामुख्याने माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार जयंतराव जगताप तसेच युवा नेते दिग्विजय बागल या गटांमध्ये कमालीची चुरस रंगणार आहे तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींपैकी वंजारवाडी व लिंबेवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर २८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली आहे. यामध्ये अंजनडोह येथे सरपंचपद बिनविरुद्ध झाले असून ग्रामपंचायत सदस्य पदाच्या एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. टाकळी, गोयेगाव, रिटेवाडी, मांजरगाव ग्रामपंचायतीमध्ये सदस्य बिनविरुद्ध झाले असून सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत आहे. मोरवड येथे काही जागा बिनविरुद्ध झाल्या असत्या मात्र अवघ्या दोन सेकंदामुळे निवडणूक लागली आहे.
करमाळा तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गट यांच्यातील कार्यकर्त्यांमध्ये लढती होत आहेत. स्थनिक पातळीवर कार्यकत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेत सोईनुसार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वाशिंबे येथे मात्र प्रा. रामदास झोळ यांचा पॅनेल यावेळी पहिल्यांदाच स्वतंत्रपणे रिंगणात उतरला आहे. येथे शेवटच्या क्षणी बागल गट व प्रा. झोळ यांच्यात फूट पडली आहे. बागल गट येथे फक्त सरपंचपद लढवत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. निवडणूक सनियंत्रण अधिकारी तहसीलदार समीर माने व नायब तहसीलदार विजयकुमार जाधव हे सकाळपासून पंचायत समितीच्या सभागृहात उपस्थित होते. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
अर्ज मागे घेण्यासाठी जसा कालावधी कमी होत चालला होता तशी पॅनेलप्रमुख व कार्यकर्त्यांमध्ये धावपळ दिसत होती. शेवटच्याक्षणी अर्ज मागे घेण्याचा वेळ संपत असल्याचे जाहीर झाले तेव्हा मोरवड येथील काही कार्यकर्ते अर्ज मागे घेण्यासाठी आले. मात्र ते सभागृहाच्या पायऱ्या चढत होते आणि दरवाजा बंद झाला. अवघ्या दोन सेकंदामध्ये ही प्रक्रिया झाली. त्यानंतर त्यांना वेळ संपल्यामुळे सभागृहात जाता आले नाही. त्यामुळे अर्ज मागे घेता आले नाहीत. अन्यथा तेथे आणखी काही जागा बिनविरुद्ध झाल्या असत्या.
करमाळा तालुक्यात २४४ ग्रामपंचायत सदस्य व ३० सरपंचपदासाठी ९० प्रभागात निवडणूक लागली आहे. यासाठी ३९२ सदस्य पदासाठी व सरपंचपदासाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत. बिनविरुद्ध झालेली दोन गावे सोडून ७० जागा बिनविरुद्ध झाल्या आहेत. माघार घेण्याचा वेळ संपल्यानंतर काही वेळातच उमेदवारांना चिन्ह देण्यात अली आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष