भाऊराव पाटील, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा अवमान करणाऱ्या चंद्रकात पाटलांच्या थोबाडाला काळं फासु: उत्तरेश्वर कांबळे
By : Polticalface Team ,10-12-2022
करमाळा प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले पुढारी नेहमीच बहुजन महापुरूषांचा अवमान करण्यात अग्रेसर असुन भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी अनुदानासाठी सरकार वर अवलंबून का राहता? कर्मवीर भाऊराव पाटील, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली असे संतापजनक आणि वादग्रस्त विधान करून महापुरुषांचा अवमान केला आहे.
त्यांच्या ह्या बेताल वक्तव्याने समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असुन वाचाळ चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी. मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार माध्यमातून केली आहे.
अधिक बोलताना कांबळे म्हणाले की भाजपाचे नेते ,कार्यकर्ते वारंवार बहुजन महापुरुषांचा अवमान करत असुन या विधानाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी बहुजन समाजाची जाहीरपणे माफी मागावी तसेच राजीनामा द्यावा अन्यथा चंद्रकांत पाटील जिथे दिसेल तिथे त्यांच्या त्यांच्या थोबाडाला काळं फासण्यात येईल अशा गर्भीत इशारा कांबळे यांनी दिला आहे.
वाचक क्रमांक :