चालत्या वाहनात महिलेचा विनयभंग; उडी मारल्याने चिमुरडीचा मृत्यू

By : Polticalface Team ,11-12-2022

चालत्या वाहनात महिलेचा विनयभंग; उडी मारल्याने चिमुरडीचा मृत्यू मुंबई : खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या एका महिलेचा गाडीतील वाहनचालक आणि प्रवाशांनी विनयभंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वसई मध्ये घडली. या प्रकारामुळे 20 वर्षीय महिलेने आपल्या चिमुकल्या मुलीसह धावत्या गाडीतून उडी मारली. या घटनेत दहा महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर ही महिला जखमी झाली. या प्रकरणी विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात वाहनचालक आणि इतर तीन अनोळखी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी, वाडा येथे राहणारी २० वर्षांची महिला दहा महिन्यांच्या मुलीसह नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार गावातील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. ती वाडा येथे परत जाण्यासाठी निघाली होती. खासगी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या इको वाहनात ती मुलीसह बसली या वेळी वाहनांमध्ये अन्य तीन प्रवासी होते.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हारजवळील नोवेल्टी हॉटेलच्या समोरून जात असताना या महिलेने मुलीसह गाडीतून उडी मारली. या घटनेमध्ये मुलीचा मृत्यू झाला तर महिला जखमी झाली. वाहनचालक तसेच इतर प्रवाशांनी माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून मी मुलीसह उडी मारल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यामध्ये वाहनचालक तसेच इतर प्रवाशांविरोधात विनयभंगाचा तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले असून इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी