चंदकांत पाटील, कोणत्या लखोपती करोडपती जहागीरदाराकडे शाळा सुरू करण्यासाठी, भिक मागीतली याचे पुरावे सादर करा, दौंड पॅंथरचा सवाल

By : Polticalface Team ,11-12-2022

चंदकांत पाटील, कोणत्या लखोपती करोडपती जहागीरदाराकडे शाळा सुरू करण्यासाठी, भिक मागीतली याचे पुरावे सादर करा, दौंड पॅंथरचा सवाल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,११ डिसेंबर २०२२, राज्यातील भाजपचे सत्ताधारी नेते चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील कार्यक्रमात बोलताना म्हणाले महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांनी भिक मागुन शाळा सुरू केली होती असे बेताल वक्तव्य केल्याने राज्यातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात, समस्त बहुजन वर्ग संताप व्यक्त करु लागला असुन, दौंड शहरातील पॅंथरचे जेष्ठ नेते नागशेनजी धेंडे,भारत सरोदे, जयदीप बगाडे, नरेश डाळिंबे, अमर जोगदंड, तसेच समस्त बहुजन पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे, चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात यावा असे लेखी निवेदन देण्यात आले आहे,

दौंड पोलीस स्टेशन समोरील संविधान स्तंभ या ठिकाणी पॅंथरचे जेष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, या वेळी चंदकांत पाटील यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी, शाळेसाठी कोणत्या लखोपती, करोडपती जहागीरदाराकडे भिक मागीतली होती याचे स्पष्टीकरण व पुरावे त्यांनी सादर करावे,अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मागणी करण्यात आली आहे, अन्यथा राज्यातील पोलीस प्रशासनाने चंदकांत पाटील यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी केली आहे.

चंदकांत पाटील यांच्या अंगावरती शाई फेक करण्यात आली म्हणजे फार मोठा गंभीर गुन्हा होत नाही, मात्र पोलिस प्रशासनाने, सदर व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करणे योग्य आहे का,? असा सवाल उपस्थित करण्यात आला, शाई फेक करणाऱ्या युवकांवर पोलीस प्रशासनाने कायद्याचा वापर करून, सुड बुद्धीने खुनाचा व अतिरिक्त गुन्हे दाखल केले आहेत.
कलम ३०७- खुनाचा प्रयत्न कलम ३५५- एखाद्या व्यक्तीला जाणीवपुर्वक दुखापत करणे कलम ३५३- एखाद्या लोक प्रतिनिधीला त्याच्या कामापासुन धाकाने परावृत्त करणे, कलम २९४- सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करणे, कलम ५००- मंत्री किंवा लोकसेवकाची मानहानी, कलम ५०१- अब्रुनुकसान करणे, कलम १२०-ब- फौजदारीपात्र कट रचणे फौजदारी कलम ७- कामाच्या ठिकाणी अवमान करणे महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७(१)(३) महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५- सार्वजनिक शांततेचा भंग करणे.

अशा प्रकारे वाढीव गुन्हे दाखल केले आहेत, या संदर्भात पोलिस प्रशासनाच्या हुकुमशाही कामगिरीवर, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पॅंथरचे ज्येष्ठ नेते नागशेनजी धेंडे,नरेश डाळिंबे भारत सरोदे, जयदीप बगाडे, पंपु बनसोडे, विनोद भालेराव, यांनी मनोगत व्यक्त केले, या वेळी दौंड शहरातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

शाई फेकल्याने एखाद्याचा खुन होतो, हे नविनच लॉजिक पोलीस प्रशासनाने ग्राह्य धरले आहे, शाई च्या धारदार शस्त्राने मानसाचा जीव जातो काय ? असा सवाल पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर त्यांनी उपस्थित केला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष