दौंड नगरपालिका झालीय दुर्लक्षित, पदाधिकारी मात्र शिस्तीत, शहरातील नागरीक हैराण होऊन लागलेत झिंगायला

By : Polticalface Team ,11-12-2022

दौंड नगरपालिका झालीय दुर्लक्षित,  पदाधिकारी मात्र शिस्तीत, शहरातील नागरीक हैराण होऊन लागलेत झिंगायला दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०७ डिसेंबर २०२२, दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यांनी दौंड नगरपालिकेचा पदभार हाती घेतल्या पासून किती दिवस त्यांनी नगरपालिकेचा अधिकारी या जबाबदारीने हजर आहेत. असे आधिकारी आसतील तर दौंड शहराची काय अवस्था होणार. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकार दौंड नगरपालिका हद्दीतून नागरिक बाहेर जाण्याची वाट पहात आहे का ? असा सवाल नागरिक उपस्थित करु लागले आहेत, कुठे नेऊन ठेवलं आमचं दौंड शहर ? या कडे कोणी लक्ष देईल का ? फक्तं कधी नागरिक दौंड शहरा बाहेर जातील आणि आम्ही तत्काळ बातमी बनवू असा खोचक प्रश्न वेळोवेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित करु लागले आहेत, त्यामुळे नागरिकांच्या विविध समस्यांना प्रथम प्राधान्य मिळावे दौंड शहरातील जनतेचे प्रश्न उपस्थित करुन ते मार्गी लागावेत अशी भूमिका लोकशाहीच्या मार्गाने घेण्यात यावेत, दौंड शहर नगरपालिकेने मलनितसरन प्रकल्पाच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून देखील हा प्रकल्प बंद अवस्थेत पडुन आहे. या संदर्भात कोणी बोलायला तयार नाहीत. सरळ सगळे दुर्गंधीचे घाण पाणी नदीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे नदी कडेच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आली आहे, परिसरातील लहान मोठे जनावरे मृत्युमुखी पडू लागल्यावर बातमी देणार का ? असा गंभीर आरोप प्रसार माध्यमांवर केला जात आहे, अशा महत्वाच्या विषयावर प्रसार माध्यम कधी लक्ष देणार आहे का ? वेळे आधी सावध भुमिका बाळगून कर्तव्याशी एकनिष्ठ राहुन संबंधित प्रशासनाने झाकलेले डोळे उघडावेत अशी स्पष्ट भूमिका घेऊन लोक कल्याणकारी जनहितार्थ कार्याला आपण चौथा स्तंभ म्हणवुन घेऊ शकतो. आपल्या लेखणीला दुधारी शस्त्र संबोधले जाते, दौंड शहरातील सिध्दार्थ नगर मधील बौद्ध वस्ती समोरील सार्वजनिक रस्ता अध्याप प्रलंबित असुन काम पूर्ण झाले नाही, वाहतूक कोंडी पार्किंग या संदर्भात दौंड शहरातील पत्रकार स्पष्ट लिखाण का करत नाहीत. बोलत नाहीत. ? त्या बौद्ध वस्ती मध्ये राहणारे लोक माणसं नाहीत का ? फक्त आणि फक्त शहरातील व्यापारी लोक माणसं आहेत का ? हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे, खरं तर दौंड शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शहरात सगळीकडे वेळेत पाणी येते मात्र अनुसूचित जाती आणि नवबौद्ध लोकवस्ती मध्ये पाणी पुरवठा वेळेत येत नाही. दौंड नगरपालिका विरोधात हंडा मोर्चा होतो. आंदोलनं होतात मात्र दखल घेतली जात नाही. तरीही पत्रकार गंप्प कसे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, दौंड नगरपालिका सदर प्रकरणी निष्कार्य पणाची भुमिका बजवत असल्याचे निष्पन्न झाले असुन पदाधिकारी मात्र शिस्तीत असल्याने शहरातील नागरीक मनस्तापाने झिंगायला लागले आहेत, शहरातील नागरिकांनी मूलभूत गर्जा अधिकार हक्क जबाबदारीने बजावली तर असा प्रश्नच निर्माण होणार नाही प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहून नागरिकांचे हक्क बजावली पाहिजे प्रसार माध्यम नागरिकांच्या बरोबर असेल अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमातून व्यक्त केली जात आहे, दौंड शहरातील आजी माजी राजकीय पदाधिकारी तसेच विविध पक्षाचे नेते मंडळी आणि शासकीय पदाधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन दौंड शहर स्वच्छ सुंदर अभियान राबविण्यात आले पाहिजे अशी प्रतिक्रिया पॅंथरचे ज्येष्ठ नेते नागशेनजी धेंडे, भारत सरोदे, जयदीप बगाडे, नरेश डाळिंबे, पांडुरंग गायकवाड, रोहित पाडळे, सुधीर वाघमारे, आदी दौंड शहरातील न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य दौंड पुणे यांनी व्यक्त केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष