सनदी अधिकाऱ्याच्या व ग्रामपंचायतीच्या संगनमताने २ गुंठे क्षेत्रावर अतिक्रमण करून केला वहीवाटीचा रस्ता बंद राजाळे.(ता.फलटण).

By : Polticalface Team ,12-12-2022

सनदी अधिकाऱ्याच्या व ग्रामपंचायतीच्या संगनमताने २ गुंठे क्षेत्रावर अतिक्रमण करून केला वहीवाटीचा रस्ता बंद राजाळे.(ता.फलटण). दिनांक ९/१२/२०२२ राजाळे गावातील शंभूसेना जिल्हाध्यक्ष निखिल निंबाळकर यांनी ९/०६/२०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी व जिल्हा भूमि अभिलेख कार्यालय सातारा यांना ग्रामस्थांच्या सह्या घेऊन निवेदन देऊन राजाळे गावातील गट.नं.६२६ ,६२७ मधून जाणारा जानाई मंदिर ते सरडे रोड हा जुना रस्ता पुण्यातील संतोष पांडुरंग मेंगे यांनी महाराष्ट्र शासन मुळ भोगवटादार बाळकृष्ण बनकर यांच्या कडून १४० चौ.मी क्षेत्र विकसन करार करून घेतले होते.त्या जागेवर अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. तो काढून मिळावा म्हणून अर्ज व निवेदन मुळ कागदपत्रासह दिले होते त्याची दखल घेऊन तहसिलदार फलटण यांना योग्य कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले होते त्यानुसार भूमि अभिलेख फलटण कार्यालयात ६२६ व ६२७ मोजनीचे पैसे निखिल निंबाळकर यांनी भरून दिनांक १९/१०/२०२२ रोजी भूमि अभिलेख कार्यालय फलटण येथील कर्मचारी शेलार साहेब यांनी लगतदार पंच ग्रामसेवक यांच्या समक्ष शासकीय मोजनी केली असता. मोजणीच्या नकाशावरून असे निदर्शनास आले आहे की पुण्यातील मेंगे यांनी राजाळे गावातील माजी सनदी अधिकारी याच्या मार्फत ती जागा घेऊन २००८ २००९ मध्ये त्या जागेवर २ गुंठे पेक्षा जास्त क्षेत्रावर अतिक्रमण करून इमारत बांधकाम केले आहे. आणि इमारतीतील गाळे दुकाने गावातील लोकांना बेकायदेशीर दस्त करून ग्रामपंचायतीच्या संगनमताने भाडे करार करून नोंदी केल्या आहेत. तरी तहसिलदार फलटण यांना भूमिअभिलेख कार्यालायाने अहवाल पाठवला असून त्यावर काय कारवाई केली जाणार याची संपूर्ण गावातील ग्रामस्थ वाट पाहत आहेत. माजी सनदी अधिकारी याच्या दबावामुळे शासकीय कारवाई करू नये या साठी दबाब असल्याची चर्चा आहे. तरी या प्रकरणावर जिल्हाधिकारी कार्यालयाने योग्य कारवाई केली नाही तर ग्रामस्थ उपोषण व जनहित याचिका दाखल करून न्याय मिळविण्याच्या तयारीत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष