खालापूरी ग्राम पंचायत निवडणूकीत माऊली ग्राम विकास परिवर्तन पॅनलचीच सत्ता येणार-डॉ जितीन वंजारे

By : Polticalface Team ,14-12-2022

खालापूरी ग्राम पंचायत निवडणूकीत माऊली ग्राम विकास परिवर्तन पॅनलचीच सत्ता येणार-डॉ जितीन वंजारे बीड प्रतिनिधी:-सध्या बीड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. बीड जिल्हयातील बऱ्याच गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकी पार पडत आहेत त्याचप्रमाणे खालापुरी येथील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2022 तीन पॅनल सह पार पडत आहे यामध्ये माजी पंचायत समिती सदस्य नारायणभाऊ परजने, पंढरी परजणे,सामाजिक कार्यकर्ते डॉ.जितीनदादा वंजारे, मुरली उगले, विष्णू जाधव, सोमनाथ डोके, अमोल भस्मारे, विनायक गवळी, सुरेश परजने, रवींद्र परजने व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उभा राहिलेला माऊली ग्रामविकास परिवर्तन पॅनल लोकप्रिय ठरत असून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
खालापूरी गाव हे मागच्या वीस वर्षापासून बऱ्याच योजनेपासून वंचित असून गावात रस्त्याचे दुर्दशा आहे.वस्तीवर जाणारी रस्ते व्यवस्थित नसून पावसाळ्यामध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावातील काही रस्ते खराब झालेले आहेत वीस वर्षांपूर्वी झालेली रस्त्याच्या कामामध्ये परत सुधारणा झालेली नाही.गावात पाणंद रस्ते होत नाहीत गावातील बेलुरपांदी रोड, मुंढेपांदी रोड, राजरत्न नगर रोड, जाधववस्ती रस्ता,शेख वस्ती रस्ता इत्यादी रस्त्याची दूरावस्था झाली असून पावसाळ्यात ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.गावामध्ये नालीच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन नसून जागोजागी नाली कोंडलेल्या आहेत, स्वच्छतेच्या नावाने काहीच योजना राबवली जात नाही, गावामध्ये व वस्ती वरती योग्य पद्धतीने लावलेली नाहीत,गावांमध्ये सिंचनाच्या योजना म्हणावे तितक्या प्रभावीपणे राबवल्या जात नाही, शासकीय योजना दुजाभाव करून राबवल्या जातात, गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असुन त्याला आलेले बजेट ढिसाळ नयोजनामुळे वापस गेले इतक्या निस्क्रिय काम करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून यंदा परिवर्तन निश्चित आहे.शासकीय योजनेत राजकारण केले जाते. गटवरी करून, दूजाभाव करून योजना दिल्या जतात ही निंदनीय बाब आहे त्यामुळे एकंदरीत गावच्या विकासामध्ये खंड पडत चालला असून गावातील सुज्ञ नागरिकांच्या मदतीने सुशिक्षित लोकांच्या मार्गदर्शनाखाली माऊली ग्राम विकास पॅनल ची स्थापना झाली असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पाहिजे ती ताकद लावून पॅनल टू पॅनल निवडून आणण्यासाठी पॅनलचे सर्वच मावळे काम करत आहेत आणि खालापुरी ग्रामस्थांमध्ये माऊली ग्राम विकास परिवर्तन पॅनल आघाडीवर असून जनतेतून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे असे स्पष्ट मत डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले. खालापूरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी उच्चशिक्षित, स्पष्ट व्हिजन, प्रत्येक योजना प्रभावीपने राबविणारी यंत्रणा असणाऱ्या लोकांचा एक गट तयार झाला असून सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करून सर्वसमावेशक काम करणाऱ्या माऊली ग्राम विकास परिवर्तन पॅनल ला सर्वांचीच साथ असून नारायण परजने, पंढरी परजने, सामजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे यांच्या मार्गदर्शनाने पॅनल निवडून येईल असा विश्वास डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केला. गावांमध्ये गेल्या पंचवार्षिक मध्ये प्रभावी कामे झाली नसून घरकुल यादी, पोखरा योजना, गावांमध्ये दलीत सुधार योजनेचा निधी गैव्यवहार होत आहे, गावात सर्व जातधर्माच्या लोकांना प्रार्थना स्थळे आहेत पण बौद्ध बांधवांसाठी बुद्ध विहार, समता ध्वज नाही. माळी समाजाच्या लोकांसाठी एखाद सभागृह नाही, वस्त्यांवर जनावरांना पाणवठे नाहीत, गावात पानी नळ योजना प्रभावीपणे रवावलेली नाही, पथदिवे हे फक्त मर्जीतल्या लोकांनाच दिल्याची गोष्ट समोर आल्या आहेत.गोरगरिबांना घरकुल योजना दिली गेली पाहिजे पण इथे टोलेजंग बंगले असणाऱ्या व्यक्तीच्या घरात दोन दोन घरकुले मंजूर केल्याचा प्रताप आहे त्यामुळे दूजाभाव,मनुभाव, गटवारी करणाऱ्या व्यक्तीला सरपंच पदावर बसण्याचा जराही अधिकार नाही त्यामूळे यंदा नागरिकांनी मतदार बंधू भगिनींनी योग्य पारदर्शक कारभारासाठी माऊली ग्राम विकास परिवर्तन पॅनल ला साथ द्यावी आणि खालापूरी च्या सर्वांगिण विकासाचा एक धागा व्हावे असे मत डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष