करमाळा नगर परिषदेचा दिव्यांगासाठी सामाजिक उपक्रम. दिव्यांगाना सहानुभूती सह सक्षमीकरणाची गरज मुख्याधिकारी बालाजी लोंढे.

By : Polticalface Team ,15-12-2022

करमाळा नगर परिषदेचा दिव्यांगासाठी सामाजिक उपक्रम. दिव्यांगाना सहानुभूती सह सक्षमीकरणाची गरज मुख्याधिकारी बालाजी लोंढे. करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या वतीने माजी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत, करमाळा शहरातील दिव्यांग सक्षमीकरण कार्यशाळा, मा.जयवंतराव जगताप बहुउद्देशी सभाग्रह येथे आयोजित कार्यशाळा प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजानन गुंजकर होते. प्रमुख पाहुणे अजित रायपुरकर क्ष-किरण वैद्यकीय अधिकारी, मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, रोहन भालेराव, दामोदर परबत, आरोग्य निरीक्षक जब्बर खान, दीनदयाळ उपाध्ये विभागाचे तुषार टंगसाळे हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना बालाजी लोंढे म्हणाले की यूआयडी कार्ड, ऑनलाइन प्रमाणपत्र, शासनाच्या विविध योजना, यासाठी लागणारे तत्सम कागदपत्र प्राप्त करण्यासाठी दिव्यांगाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या निवारण्यासाठी व त्यांच्या हिताच्या दृष्टीने सहानुभूतीसह सक्षमीकरण कार्यशाळाची गरज आहे.यामुळे विचारांची देवाण-घेवाण होते हे कार्य व सहकार्य दिव्यांगाच्या सहभागाने करमाळा नगरपरिषद करीत आहे. डॉक्टर गजानन गुंजकर व अजित रायपुरकर यांचेही मार्गदर्शन लाभले.तर प्रास्ताविक मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी केले. सूत्रसंचालन करमाळा नगरपरिषद चे इसाक पठाण यांनी केले. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे, संतोष कुंभार,समीर बागवान,भाऊसाहेब आरणे, प्रशांत कांबळे, तानाजी सुरवसे, आसमा कुरेशी, दिलीप किरवे, अक्षरा बोरा, हेमंत शिंदे, संजय मुरकुटे, सत्तार शेख, ज्योतीराम माने, गोरखनाथ जाधव, किशोर कुंभार, सुशील गानबोटे, , बाळासाहेब दीक्षित, निर्मला भुसारे, सुशील वनारसे, उत्तम क्षीरसागर, शुभम कुंभार, वासंती टकले दुर्गा क्षीरसागर, इत्यादीसह बहुसंख्येने दिव्यांग उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करमाळा नगर परिषदेचे कार्यालयीन प्रमुख दिगंबर देशमुख, मिळकत विभागाचे गजानन राक्षे, अभय देशपांडे, रावसाहेब कांबळे, राजेंद्र झाडबुके, सुरज मेहतर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.शेवटी आभार, प्रहार आपंग क्रांती आंदोलन संघटनेचे करमाळा शहराध्यक्ष समीर बागवान यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.