अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय युवा पत्रकार रत्न पुरस्कार मानेगाव येथील पत्रकार राजेंद्र कुमार गुंड यांना जाहीर
By : Polticalface Team ,16-12-2022
करमाळा प्रतिनिधी माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे सुपुत्र,आदर्श शिक्षक तथा दैनिक पुण्यनगरीचे मानेगाव प्रतिनिधी पत्रकार राजेंद्रकुमार गुंड (सर) यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा "राज्यस्तरीय युवा पत्रकाररत्न पुरस्कार -2022" जाहीर झाला आहे
मानेगाव येथील युवा पत्रकार राजेंद्रकुमार गुंड हे गेली पंधरा वर्षाहून अधिक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने राज्यस्तरीय युवा पत्रकार रत्न पुरस्कार जाहीर केला आहे सदरचा पुरस्कार त्यांना लवकरच देण्यात येणार असून त्यांना पत्रकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे करमाळा तसेच माढा तालुक्यातील पत्रकार संघटने च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले आहे
वाचक क्रमांक :