भाषण सुरू असताना राम शिंदेंना आला फडणवीसांचा फोन : कार्यकर्त्यांशी घडविला संवाद
By : Polticalface Team ,16-12-2022
अहमदनगर : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांपैकी 12 बाजार समित्यांची निवडणूक जवळ आली आहे. त्यादृष्टीने आमदार राम शिंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिंदे बोलत असतानाच त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत फडणवीसांना विनंती केली. त्यामुळे फडणवीसांनी फोनवरूनच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बाजार समिती निवडणुकीच्या दृष्टीने राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिंदे उभे राहिले. त्वेषात भाषण सुरू असतानाच अचानक फडणवीसांचा फोन आला. त्यांनी फोन उचलला. आणि सध्या बाजार समिती निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत फडणवीसांना विनंती केली.
ही विनंती फडणवीस यांनी मान्य केली. त्यांनी तो मोबाईल.कार्यकर्त्यांसमोर धरत स्पिकरवर लावला. फडणवीसांनी सांगितले की, राम शिंदे यांनी विषय सांगितला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्वांना अधिक मेहनत करायची आहे. सर्वांनी एकत्रित रहायचे आहे. आणि बाजार समितीची निवडणूक जिंकायची आहे, असा संदेश त्यांनी दिला.
वाचक क्रमांक :