राज्यपालांना लाज वाटली पाहिजे... शरद पवार संतापले
By : Polticalface Team ,17-12-2022
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशायरी यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्याचा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निषेध केला. तसेच राज्यपालांना लाज वाटली पाहिजे, त्यांची तात्काळ हकालपट्टी करा, नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल... अशा तीव्र शब्दात शरद पवार यांनी एकप्रकारे केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, सीमावाद आणि राज्यातून बाहेर चाललेले मोठं मोठे प्रकल्प या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पवार यांनी मोर्च्याला हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारलेला दिसून आला. यावेळी त्यांनी राज्यपालांवर कडाडून टीका केली.
पवार म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल वादग्रस्त वक्तव्य करत आहे. असे करताना राज्यपालांना शरम वाटली पाहिजे. अशा व्यक्तीला राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची लवकर पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी पवार यांनी यावेळी केली. ते महाविकास आघाडीच्या महामोर्चाला संबोधित करत होते.
मी लोकशाही मार्गाने सांगतो. लोक शांत आहेत. राज्यपालांची हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल. तसेच महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सन्मानीय स्थानं आहेत. त्यांच्याबद्दल काहीही बोलतात. राज्यात असा राज्यपाल पाहिला नाही. शंकरदयाळ शर्मांपासून अनेक राज्यपाल पाहिले. या राज्यपालांनी महाराष्ट्राचा नावलौकीक वाढवला. पण आजचे राज्यपाल महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात नेत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी