By : Polticalface Team ,18-12-2022
आपल्यावर पुन्हा शाई हल्ला झाल्यास त्यातून चेहऱ्यावर शाई पडू नये तसेच डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी म्हणून पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावले जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मंत्री पाटील यांनी फेसशिल्ड घातल्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फेस शिल्डवर पाटील म्हणाले... एखाद्याला शाई फेकून आनंद मिळत असेल तर चांगले आहे. सर्वांना प्रश्न पडेल की फेस शिल्ड घाबरून घालून आलेत का? मी घाबरत नाही, एखाद्याला शाई फेकून आनंद मिळतो पण माझे कार्यकर्ते आणि पोलीस काय झोपलेले नाहीत असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर १० डिसेंबरला पिंपरी-चिंचवड शहरात शाई फेकून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील पवनाथाडी जत्रेच्या उद्घाटनासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरात दाखल झाले होते. मात्र परत शाईफेक होण्याच्या भीतीने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाचक क्रमांक :