माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची वार्षिक बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकारी यांची नियुक्ती
By : Polticalface Team ,19-12-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
पुणे,ता १८ डिसेंबर २०२२, महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ( महासंघ) या संघटनेची पुणे जिल्हा कार्यकारणीची महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या शासकीय विश्रामगृह, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये जाहिर करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्षपदी राहूल बानगुडे , जिल्हा कार्याध्यक्षपदी मंगलदास निकाळजे (बारामती ) तर महिला जिल्हाध्यक्षापदी वैशाली दोरगे (भांडगाव ) यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर व जेष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते सुनिल गुजर यांच्या हस्ते सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले. सर्वसामान्य जनतेमध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याचा प्रसार व प्रचार करण्याचा संकल्प करून तो पूर्ण करावा अशी अपेक्षा सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केली. जेष्ठ कार्यकर्ते सुनिल गुजर यांनी माहिती अधिकार कायद्याच्या सोबत जागरुक नागरिक म्हणून आपल्याला संविधान समजून घेऊन त्याचा जीवन व्यवहारात उपयोग करावा लागेल असे सूचित केले. यावेळी सोशल मिडीया प्रमुख राहुल कदम व राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार अवचट यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पुणे शहर व जिल्हयातील सर्वच तालुकातील पदाधिकारी , महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :