आमदार बबनराव पाचपुतेंना पुतण्याचा डबल धक्का; मुलाचा पराभव

By : Polticalface Team ,20-12-2022

आमदार बबनराव पाचपुतेंना पुतण्याचा डबल धक्का; मुलाचा पराभव अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांचे पूत्र प्रतापसिंह यांचा पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केलाय. त्यामुळे पाचपुते यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बबनराव पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीतील चाणक्य म्हणून त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते ओळखले जात होते. दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते यांचे निधन झाले होते. त्यानंतर पाचपुते कुटुंबात संघर्ष सुरू झाला. त्यामुळे ४० वर्षांत पहिल्यांदा काष्टी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत बबनराव पाचपुतेंचा पॅनल पराभूत झाला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत बबनरावांच्या पॅनलला साजन पाचपुते यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपची संपूर्ण यंत्रणा या निवडणुकीत प्रतापसिंहांच्या मदतीला धावली मात्र तरीही साजन पाचपुते यांनी वडील सदाशिव पाचपुते यांची पुण्याई व जनसंपर्काच्या बळावर त्यांना पराभूत केले.

आज झालेल्या मतमोजणीत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार साजन पाचपुते यांनी १६१ मतांनी सरपंचपद मिळविले. या ग्रामपंचायतील १७ जागा आहेत. त्यापैकी बबनराव पाचपुतेंच्या पॅनलने १० तर साजन पाचपुतेंच्या पॅनलने ७ जागा मिळविल्या आहेत. बबनरावांनी ग्रामपंचायतीवर सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी सरपंचपद गमावले आहे. त्यामुळे बबनराव पाचपुते यांचा १९८० पासून श्रीगोंदे तालुक्यावर असलेल्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याची चर्चा आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी